SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

‘गोकुळ’ च्या रक्षाबंधन परंपरेतून २० वर्षांचा ऋणानुबंध जपला...

schedule09 Aug 25 person by visibility 693 categoryउद्योग

कोल्हापूर : गोकुळने सहकार्य केलेल्या निराधार महिलांच्या कडून रक्षाबंधन निमित्त राखी बांधून घेण्याची परंपरा २००५ साली तत्कालीन चेअरमन विश्वास पाटील यांनी सुरु केली असून त्यांनी व सहकारी संचालकांनी गेली २० वर्ष ती जपलेली आहे. त्यानुसार आज संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील व संचालक युवराज पाटील यांना रक्षाबंधन निमित्त राजापूर ता.शिरोळ येथील श्रीमती भारती चिंचणे व बेलवले, ता.कराड येथील श्रीमती वैशाली शिंदे यांनी राखी बांधून ऋणानुबंध जपले हा कार्यक्रम गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे पार पडला.

   यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्रीमती वैशाली शिंदे यांनी गोकुळचे अशिर्वाद माझ्या सारख्‍या अनेक निराधार महिलाना लाभले आहेत. गोकुळचा ऋणानुबंध जिवनात नवीन अशा आकांक्षा निर्माण करणारा असून गोकुळचे हे ऋण याजन्मी न फिटणारे आहे. गोकुळ परिवारास माझ्या सारख्या अनेक निराधार महिलांचे आशीर्वाद लाभोत व विश्वात गोकुळचे नाव उज्वल होवो अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. एड्स सारख्या असाध्य रोगाची लागण झाल्यामुळे जीवन उध्वस्त झालेल्या वैशाली शिंदे या प्रबोधनच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृतीचे काम गेली २१ वर्ष अव्याहतपणे करत आहेत. अश्या भावना श्रीमती वैशाली शिंदे रक्षाबंधन निमित्त राखी बांधताना व्यक्त केल्या .                     

   राजापूर, ता. शिरोळ येथील महिला भारती चिंचणे यांचे पती २००५ च्या महापुरात वाहून गेले. एवढेच नाही तर त्यांचे राहते घर व जनावरे देखील या पुरात वाहून गेलीत. त्यांचेवर कोसळलेला दु:खाचा डोंगर सावरण्यासाठी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी भारती चिंचणे यांना घर बांधण्यासाठी त्यावेळी गोकुळमार्फत आर्थिक सहाय्य करून त्यांच्या जीवनात जगण्याची उमेद निर्माण केली.याची जाण ठेवून भारती चिंचणे व वैशाली शिंदे यांनी गेली २० वर्षे गोकुळचे व आपले ऋणानुबंध रक्षाबंधनाच्या निमित्ताने जपलेले आहेत.

     यावेळी  संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील,दीपक पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes