SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेस उत्साहात प्रारंभराज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन १०८८ पदांची भरती प्रक्रिया सुरूकोल्हापूर जिल्ह्यातील 51 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 4.89 टीएमसी पाणीसाठाआजचा फॅशन डे: स्वतःच्या शैलीचा नवा आविष्कारमहाराष्ट्रात नर्सिंग शिक्षणाची दहा नवीन सरकारी महाविद्यालये मंजूर; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती​‘त्या’ घटनेने पेठवडगाव सुन्न: भरदिवसा, भररस्त्यात पत्नीचा बळी; आरोपी पतीच्या शोधात पोलीसपंचगंगा घाट व शाहू मिल परिसराची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणी; आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशएसआयआर मोहिमेला मुदतवाढ द्या; सतेज पाटील यांची मागणी शैक्षणिक गुणवत्तेत कोरे डिप्लोमाची पुन्हा एकदा बाजी; महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून 'अतिशय उत्कृष्ट' मानांकनपंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरू

जाहिरात

 

अनुष्का जमदाडे व हर्षला पाटील यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

schedule23 May 26 person by visibility 439 categoryक्रीडा

वारणानगर : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयच्या खेळाडू अनुष्का कृष्णात जमदाडे व  हर्षला विजय पाटील (12 वी. विज्ञान) यांची पुद्दूचेरी येथे सुरू असलेल्या जुनियर (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या मुलींचा संघात निवड झाली आहे. दि. २२ मे पासून सुरू झालेली स्पर्धा २७ मे २०२६ चालणार आहे.

नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय जुनियर (१८ वर्षांखालील) आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धेमधून दोघींची  महाराष्ट्र संघात निवड झाली.
 
खेळाडूंना श्री. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  आमदार विनय कोरे,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम शेख, उपप्राचार्य ए. एम. अतिरकर, वारणा बास्केटबॉल क्लबचे सचिव  उदय जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक  सुहास कंदूरकर, तसेच क्रीडा मार्गदर्शक  तिरु सर, उदय पाटील, रोहित घेवारी व श्री. संग्राम दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes