+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule12 Jul 24 person by visibility 1129 categoryगुन्हे
कोल्हापूर : कागल तालुक्यातील करनुर येथील गुलाब बाबालाल शेख (वय ६५) यांच्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक करण्यात आली. १) प्रर्णोत शिवाजी धनवडे (रा. कबनूर ता. हातकणंगले) २) आकाश नरेश कांबळे (रा. चंदुर ता. हातकणंगले) ३) सौरभ दिनकर जाधव (रा. चंदुर ता. हातकणंगले) ४) सम्मेद विजय ऐनापुरे (रा. चंदुर ता. हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरने केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि ०८/०७/२०२४ रोजी कागल पोलीस ठाणेचे हद्दीत करनुर गावचे हद्दीमध्ये गुलाब बाबालाल शेख (वय ६५, रा.करनुर ता. कागल जि. कोल्हापूर) हे घरी जात असताना शेख मळ्याजवळ दोन मोटर सायकल वरुन आलेल्या पाच ते सहा अज्ञात इसमांनी त्याचे डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. सदर घडले प्रकारा बाबत त्यांचा मुलगा असिफ गुलाब शेख यांनी दिले फिर्यादी वरुन कागल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेत आला होता. गुलाब बाबालाल शेख यांचेवर सीपीआर रुग्णालयात उपचार चालु असताना ते दिनांक ११/०७/२०२४ रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला.  

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शाखेचे दोन स्वतंत्र तपास पथक तयार करुन सदर गुन्हयाचा तपास चालू केला.

सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट दिलेनंतर गुन्हा घडले ठिकाणाची भौगोलिक परिस्थीतीची माहिती घेवुन तांत्रिक तपासणी केली असता सदरचा गुन्हा हा दोन मोटर सायकल वरील अज्ञात सहा इसमांनी केलेचे निष्पण झाले. नेमलेल्या दोन पथकानी तांत्रिक तपासणी व गोपणीय माहितीव्दारे सदरचा गुन्हा हा अदया, सोम्या, पत्या व त्यांचे इतर तीन साथीदार यांनी केला असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली.

मिळाले बातमी प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखेचे पथकाने इचलकरंजी परिसरात वरील चार आरोपींना ताबेत घेवुन त्यांचे नांवे पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नावे १) प्रर्णोत शिवाजी धनवडे रा. कबनूर ता. हातकणंगले २) आकाश नरेश कांबळे रा. चंदुर ता. हातकणंगले ३) सौरभ दिनकर जाधव रा. चंदुर ता. हातकणंगले ४) सम्मेद विजय ऐनापुरे रा. चंदुर ता. हातकणंगले असे सांगितली. सदर आरोपीत यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी त्यांचे सोबत ५) आदित्य प्रकाश कांबळे रा. चंदुर ता. हातकणंगले ६) सुशांत जरळी रा. हलकर्णी असे असल्याची
माहिती दिली.

 त्यांचेकडे गुन्हया बाबत विचारणा केली असता ते घोडा गाडी शर्यतीसाठी घोडा विकत घेणेकरीता मतीवडे गावी दि.०८/०७/२०२४ रोजी गेले होते त्याच संध्याकाळी ६.३० वाचे सुमारास घरी परत येत असताना शेख मळयाकडे जाणारे रस्त्यावर मयत इसमास आरोपीत यांची मोटर सायकल घासली त्यावेळी मयत व आरोपी यांचे मध्ये किरकोळ वादावादी झाली होती. त्या कारणातुनच वरील आरोपी यांनी संगनमत करुन गुलाब बाबालाल शेख यांचे डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन ते घटनास्थळावरुन मोटर सायकल वरुन पळुन गेले होते.

  ताबेतील ४ आरोपी यांना पुढील कारवाईकरीता कागल पोलीस ठाणे येथे हजर केले असुन उर्वरित २ आरोपी यांचा शोध पोलीस घेत आहोत.

  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित , अपर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे- पाटील , उप विभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक, सागर वाघ तसेच पोलीस अमंलदार सुरेश पाटील राम कोळी, विनायक चौगले, प्रविण पाटील, विनोद कांबळे, कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, निवृती माळी, अशोक पवार यांनी केली आहे.