+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule27 Jul 24 person by visibility 265 categoryराज्य
 कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.32 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 4,5,6 व 7 हे 4 दरवाजे खुले असून सध्या धरणातून 7 हजार 212 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी, घुंगुरवाडी व कांचनवाडी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी, नवलचीवाडी क्र.2 व सुस्केवाडी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, गवशी, गारीवडे, पनोरे, म्हासुर्ली व शेळोशी, वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे, शाळी नदीवरील- येळाणे, दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी, दत्तवाड, तुरुंबे व कसबा वाळवे, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, जरळी, हजगोळी, भादवण, गजरगाव व हरळी, घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी, चित्री नदीवरील -परोली असे एकूण 95 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.32 टीएमसी, तुळशी 3.25 टीएमसी, वारणा 30.36 टीएमसी, दूधगंगा 21.24 टीएमसी, कासारी 2.28 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.19 टीएमसी, पाटगाव 3.59 टीएमसी, चिकोत्रा 1.19 टीएमसी, चित्री 1.89 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.48 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 47 फूट, सुर्वे 43.5 फूट, रुई 73.2 फूट, इचलकरंजी 70.3 फूट, तेरवाड 65 फूट, शिरोळ 62.6 फूट, नृसिंहवाडी 62 फूट, राजापूर 50.3 फूट तर नजीकच्या सांगली 39.6 फूट व अंकली 44.3 फूट अशी आहे.