+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule23 Jul 24 person by visibility 358 categoryदेश
कोल्हापूर : देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरतो. मात्र, या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केंद्रातील नेतृत्व महाराष्ट्राचा इतका राग का करते हे कळत नाही. बिहार व आंध्र प्रदेशसाठी जाहीर केलेल्या योजना पाहता हा अर्थसंकल्प या दोन राज्यांसाठीच मांडला असल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीत तरुणांनी हिसका दाखवल्यानंतर रोजगाराच्या संधीचा खोटा आभास तयार करणारे बजेट मांडले आहे. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने बेरोजगारांना खोटी आश्वासने तर दिलीच पण सर्वसामान्य घटकांनाही लॉलिपॉप दाखवले आहे. अशी टीका विधापरिषद काँग्रेस गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी केली.

एनडीएमध्ये एकनाथ शिंदे सहभागी असतानाही महाराष्ट्रात एकही प्रकल्प त्यांना आणता आलेला नाही. याउलट नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः च्या राज्यासाठी लाखो कोटींची तरतूद मिळवली आहे. 

आधीच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. त्यात अर्थसंकल्पातही महाराष्ट्राला डावलून या राज्याचे महत्व कमी करण्याचा केंद्रातील शीर्षस्त नेत्यांचा डाव आहे. पण, राज्यातील जनता ही साप्त्नक वागणूक विसरणार नाही. जसा लोकसभेला धडा शिकावला त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्येही या दुजाभावाचे योग्य उत्तर जनता देईल. असेही सतेज पाटील म्हणाले.