SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जनगणना करताना कोणताही गट अथवा समूह जनगणनेपासून वंचित राहू नये : वीरेंद्र दीक्षितछत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे आजरा येथे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात 20 मार्चपर्यंत बंदी आदेश लागूअंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफराज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी : प्रकाश आबिटकरछत्रपती शाहू मिल्सच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला साजेसे स्मारक व टेक्स्टाईल टुरिझम हबला तत्वत: मान्यता‘गोकुळ’ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा, सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी : नविद मुश्रीफअखंड भक्तीचा महामेरू: जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिक्षणशास्त्र अधिविभागात विज्ञान दिन५ व ६ मार्च रोजी पन्हाळा, गगनबावडा व आजरा आयटीआय येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

जाहिरात

 

अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

schedule05 Mar 26 person by visibility 116 categoryराज्य

मुंबई : अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नवीन रुग्णालयाच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.

नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे तसेच उपचार सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करून आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यात येणार आहे.

रुग्णालयात सध्या पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्ट नसल्यामुळे हृदयविकार उपचारांमध्ये अडचणी येत आहेत. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सर्जनची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच पूर्णवेळ कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच एंजिओग्राम मशीनच्या साहाय्याने एंजिओग्राफीसारख्या सेवा सुरू आहेत भविष्यात या सेवांचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.याशिवाय कॅन्सर उपचारांसाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे कामही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes