गोकुळ दूध संघ निवडणुकीत 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'च्या पॅनलची घोषणा दणदणीत जाहीरनामा जाहीर; दूध उत्पादकांसाठी सवलतींचा वर्षाव!
schedule08 Oct 26 person by visibility 256 categoryउद्योग
कोल्हापूर :गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी ४:३० वाजता ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयात 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'ची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत आ. सतेज पाटील यांनी आघाडीच्या पॅनेलची अधिकृत घोषणा केली आणि उत्पादकाभिमुख जाहीरनामा प्रसिद्ध केला.
यावेळी बोलताना नेत्यांनी गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्याचा संकल्प व्यक्त केला.
जाहीरनाम्यामध्ये म्हशीच्या दुधाला किमान ५ रुपये आणि गाईच्या दुधाला किमान २ रुपये दरवाढ देण्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच १ रुपयांऐवजी सध्याचे ८६ पैसे दूध उत्पादकाला परत दिले जातात, त्यात वाढ करून ९० पैसे परत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस माजी खासदार राजू शेट्टी, शेकापचे माजी आमदार जयंत पाटील, राजूबाबा आवळे, ऋतुराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्यासह गोकुळचे उमेदवार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
◼️जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे:
* दुग्धমূল्य वाढ: म्हशीच्या दुधाला किमान ५ रुपये आणि गाईच्या दुधाला किमान २ रुपये दरवाढ.
* पशुवैद्यकीय सेवा: प्रत्येक तालुक्यात २४ तास पशुवैद्यकीय सेवा देणार असून, 'डॉक्टर ऑन कॉल' सुविधेच्या माध्यमातून 'डॉक्टर रूट' सुरू करणार.
* संघोपन योजना: वासरू संगोपन योजनेच्या अनुदानात वाढ करणार.
* गोठा अनुदान: मुबलक गोकुळची संरक्षक भिंत बांधण्यासाठी ५० टक्के खर्च भार गोकुळ उचलणार; तसेच शास्त्राशुद्ध पद्धतीने बांधलेल्या गोठ्यासाठी अनुदान देणार.
* युवा उद्योजक प्रोत्साहन: गोकुळ युवा उद्योजकाच्या माध्यमातून ५ हजार तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यास प्रोत्साहन देणार.
* आरोग्य व इतर सुविधा: दूध उत्पादक व दूध संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ट्रस्टची निर्मिती करणार.
* इतर लाभ: ५ वर्षांत रोजचे दूध संकलन २० लाखांवरून ३० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, पशुखाद्याच्या दरात प्रतिμाल १०० रुपयांची कपात केली जाणार आहे.
"कोल्हापूर जिल्ह्याचा स्वाभिमान जपणाराठी... साडे पाच लाख लाखांहून अधिक दूध उत्पादकांच्या हितासाठी..." असे नमूद करत 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'च्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी नेत्यांनी केले.
◼️गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी'च्या पॅनलमधील उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
◼️सर्वसाधारण गट आणि इतर उमेदवार:
१. श्री. शशिकांत आनंदराव पाटील -चुयेकर
२. श्री. बाबासाहेब श्रीपती चौगुले
३. श्री. अभिजित प्रभाकर ताशरोटे
४. श्री. किसन बापुसो चौगले
५. श्री. राहुल बजरंग देसाई
६. श्री. बाबासाहेब विष्णू देवकर
७. श्री. उदय निवासराव पाटील (सडोलीकर)
८. श्री. विश्वजित दिनकरराव जाधव
९. श्री. विद्याधर बाबूराव गुरबे
१०. श्री. सचिन दौलतराव घोरपडे
११. श्री. सत्यजित उर्फ आबा सुरेश पाटील
१२. श्री. रणधीर विजयसिंह मोरे
१३. श्री. विश्वजित रणजितसिंह पाटील - मुरगुडकर
१४. श्री. भिमगोंडा कल्लाप्पा बोरगांवे
१५. श्री. विशाल गोपाळराव पाटील
१६. श्री. विश्ववसंतराव आनंदाराव डांगले
१७. श्री. दादासाहेब वसंतराव पाटील-साताडकर
१८. श्री. विकास पांडुरंग पाटील
१९. श्री. सुभाष बळवंत डोंगरे
२०. श्री. शाहाजी केशव पाटील
◼️महिला राखीव गट:
२१. श्रीमती अंजना केदारी रेडकर
२२. सो. भाग्यश्री धिरज डोंगळे
◼️इतर मागासवर्गीय गट:
२३. श्री. शशिकांत शामराव खोत
◼️अनुसूचित जाती जमाती गट:
२४. श्री. राजू जयवंतराव आवळे
◼️भटक्या जाती / विमुक्त जमाती गट:
२५. श्री. बयाजी देवू शेळके