+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule03 Apr 24 person by visibility 357 categoryआरोग्य
▪️प्रा. डॉ. सागर डेळेकर, डॉ. राजेंद्र पाटील, स्वप्नजीत मुळीक व अमोल पांढरे यांचे संशोधन 

कोल्हापूर : नॅनो समिश्रे आधारित मटेरियल पासून तयार केलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी होणारे महत्त्वाचे संशोधन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे प्रा. डॉ. सागर डेळेकर, म. ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगीचे डॉ. राजेंद्र पाटील, स्वप्नजीत मुळीक व अमोल पांढरे यांनी केले आहे. या संशोधनास जर्मन सरकारचे दोन पेटंट मिळाले आहेत.

 सुपरपरामॅग्नेटिक लोह ऑक्साईड व चिटोसन लेपित लोह ऑक्साईड नॅनोकणाची त्यांनी व्हिव्हो व्यवहार्यता मूल्यांकन (मूत्रपिंड, गिल्स स्नायू ऊती, मेंदू, आणि यकृत), हे साताऱ्यातील "कावेरी गर्रा" या माशांवरती केले असून हे नॅनो समिश्रे गैर-धोकादायक आणि जैवसुसंगत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संशोधनाचा उद्देश हा आहे की आपण ज्या आजारांना कर्करोग म्हणतो त्या रोगांचे उपचार करण्यासाठी आणि शेवटी बरे करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी पद्धती विकसित करणे हा आहे. विकसनशील देशांना संसाधने आणि पायाभूत सुविधांच्या अडचणींचा सामना करावा लागतो जे वेळेवर ओळख, निदान आणि व्यवस्थापनाद्वारे कर्करोगाचे परिणाम सुधारण्याच्या उद्देशाला आव्हान देतात. तसेच लक्ष्यित थेरपी, हार्मोनल थेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी या उपचार पद्धतीला पर्याय म्हणून मॅग्नेटिक हैपेर्थेर्मियाचा उपचार भविष्यात पारंपारिक पद्धतीना पर्याय असू शकतो.  

या संशोधनाचा लाभ कर्करोग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संशोधकांसह कर्करोग समस्यावर उपाय म्हणून ही होणार आहे. या संशोधनामुळे तयार करण्यात येणारी सुपरपरामॅग्नेटिक लोह ऑक्साईड व चिटोसन लेपित लोह ऑक्साईड नॅनोकण हे सध्याच्या कर्करोग क्षेत्रासाठी अनमोल देणगी देणारी ठरतील, असा विश्वास डॉ. डेळेकर यांनी व्यक्त केला. या महत्वपूर्ण संशोधनाबद्दल प्रा. डॉ. सागर डेळेकर, डॉ. राजेंद्र पाटील, स्वप्नजीत मुळीक व अमोल पांढरे यांचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी अभिनंदन केले.