SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंबेडकरांकडून विद्यार्थ्यांनी काय शिकावे ?कोल्हापूर ते वैभववाडी नवा मार्ग आणि कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, अशा दोन्ही कामांना वेग देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीकेआयटी मध्ये ‘ स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२५’ चे आयोजन अंतिम फेरीसाठी देशभरातील २८ संघ सहभागी होणारउत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे : पालकमंत्री प्रकाश आबिटकरज्याचा वर्तमानकाळ आखीव असतो,त्याचा भविष्यकाळ प्रयत्नांच्या जोरावर रेखीव व प्रभावी होतो : माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतडॉ. हर्षवर्धन पंडित यांना आंत्रप्रेन्योरशीप एक्सलन्स पुरस्कारकृषी उत्पन्न बाजार समिती सेस विरोधात व्यापाऱ्यांचा बंद यशस्वीनोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर : नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडेडीकेटीईचे प्रा. प्रविण जाधव यांना पी.एच.डी. प्रदानगार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने ५५वे पुष्प प्रदर्शन

जाहिरात

 

कोल्हापुरात अतिक्रमणावर कारवाई

schedule17 Nov 25 person by visibility 278 categoryमहानगरपालिका

▪️2 हातगाड्या, 22 स्टॅण्ड बोर्ड, 1 तंदूर भट्टी, 9 लोखंडी जाळी, 18 लोखंडी टेबल, 7 खॉट जप्त

कोल्हापूर  : शहरामध्ये वाहतूक अडथळयांना कारणीभूत ठरणा-या अनाधिकृत अतिक्रमणांविरुध्द  महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक व शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आज कारवाई करण्यात आली. माळकर तिकटी, मटन मार्केट रोड ते बिंदू चौक, आझाद चौक ते उमा टॉकीज तसेच सावित्रीबाई फुले रुग्णालय मेनरोड या परिसरात ही कारवाई करण्यात आली.

 या कारवाईत 2 हातगाड्या, 22 स्टॅण्ड बोर्ड, 1 तंदूर भट्टी, 9 लोखंडी पार्किंग जाळी, 18 लोखंडी टेबल, 7 लोखंडी खॉट असे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय रंकाळा मेनरोड, गंगावेश, फुलेवाडी या मुख्य रस्त्यावरील 16 डिजीटल बोर्ड, 195 लहान जाहिरात बोर्डवरही कारवाई करुन ते जप्त करण्यात आले.

  सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिपक जाधव, सहा.अधिक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, रविंद्र कांबळे, मुकादम शरद कांबळे व अतिक्रमण व शहर वाहतूकीच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes