SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
परीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलसिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रणघरफाळा थकबाकीदारांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडितशहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 62 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईगोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे; सतेज पाटील यांचे गाेकुळ संचालकांना घेऊन हालसिद्धनाथाला साकडेकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’शालेय पोषण आहारात 'केंद्रीय किचन पद्धती'ला तीव्र विरोध; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ ऑक्टोबरला निदर्शनेभुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभनवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी नवसाक्षरांची परीक्षाकोल्हापूर शहरास काळम्मावाडीतून दोन दिवस पाणी पुरवठा बंद

जाहिरात

 

घरफाळा थकबाकीदारांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित

schedule23 Oct 26 person by visibility 242 categoryमहानगरपालिका

◼️थकीत करापोटी ३ लाख ३५ हजार रुपये जागीच वसूल

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभाग आणि उपद्रव शोध पथकाच्या वतीने घरफाळ्याची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतधारकांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत विभागीय कार्यालय क्रमांक ४, छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत कसबा बावडा येथील गोळीबार मैदान परिसरातील लघु दशरथ बुचडे यांच्या दोन गाळ्यांवर कारवाई करून ते सील करण्यात आले. या गाळ्यांची एकूण थकबाकी १ लाख २२ हजार १८० रुपये आहे.

त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय क्रमांक १, गांधी मैदान अंतर्गत घरफाळा विभाग आणि उपद्रव शोध पथकाच्या वतीने जवाहरनगर, सुभाषनगर, साळोखेपार्क आणि रविवार पेठ परिसरात थकबाकीदार मिळकतधारकांविरोधात कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन वाणिज्यिक आणि दोन निवासी अशा एकूण पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडित करण्यात आले. या कारवाईदरम्यान थकीत घरफाळ्यापोटी ३ लाख ३५ हजार रुपये जागीच वसूल करण्यात आले.

ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, उपआयुक्त परितोष कंकाळ आणि करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

यामध्ये कर अधीक्षक अर्चना प्रभावळे, दत्तप्रसाद माजगावकर, लिपिक सागर सुतार, सुदर्शन घाटगे तसेच उपद्रव शोध पथकातील जवान सहभागी झाले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes