वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांचे राष्ट्रीय स्तरावर यश!
schedule20 Jun 25 person by visibility 162 categoryशैक्षणिक

▪️AICTE (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद) - QIP (गुणवत्ता सुधार प्रकल्प) अंतर्गत IIIT वडोदरा येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड
वारणानगर : वारणा विद्यापीठाशी संलग्न *तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (टीकेआयईटी), वारणानगर* येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे चार प्राध्यापक प्रा. डॉ. सौरभ बोरचाटे, प्रा. डॉ. संजय सुतार, प्रा. डॉ. एस. व्ही. लिंगराजू, व प्रा. विश्वजीत पाटील यांची AICTE (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद) च्या QIP (गुणवत्ता सुधार प्रकल्प) अंतर्गत भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT), वडोदरा येथे Cyber Security (सायबर सुरक्षा) व Artificial Intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
या अभ्यासक्रमासाठी संपूर्ण देशभरातून केवळ ५० प्राध्यापकांची निवड करण्यात आली असून यासाठी सुमारे १००० प्राध्यापकांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यामुळे ही निवड अत्यंत प्रतिष्ठेची व स्पर्धात्मक स्वरूपाची मानली जाते.
AICTE-QIP हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रम असून तो अभियंता प्राध्यापकांना संशोधन व उच्च शिक्षणातील संधी उपलब्ध करून देतो. या निवडीमुळे टीकेआयईटीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीला व संशोधनाभिमुख दृष्टिकोनाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
या उल्लेखनीय यशामागे वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचेअध्यक्ष मा.आ. डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन, **मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन, SETM डीन डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. मानेd यांचे प्रभावी शैक्षणिक नेतृत्व, तसेच विभागप्रमुख डॉ. पी. व्ही. मुळीक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.