हुपरीत साकारणार ६०० कोटींचा देशातील पहिला 'झिरो वेस्ट' बहुराज्यीय प्रकल्प; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी होणार पायाभरणी
schedule17 Sep 26 person by visibility 133 categoryउद्योग
◼️कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची पत्रकार बैठकी माहिती
इचलकरंजी : सहकारी तत्वावर आधारित झिराे वेस्ट संकल्पनेतून शेती उत्पादनासाठीचा 600 काेटी रुपये गुंतवणूकीचा बहुराज्य तत्वावरील प्रकल्प कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ रविवार 20 सप्टेंबर राेजी सकाळी 11 वाजता केंद्रीय सहकार तथा गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हाेणार आहे, अशी माहिती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
स्पेंट वाॅश आणि प्रेसमडपासून काँप्रेस्ड बायाेगॅस (सीबीजी) निर्मिती तसेच सायट्रीक अॅसिड व पाेटॅश निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प हुपरीत उभारला जाणार आहे. सध्याची साखर उद्याेगसमाेरील आव्हाने लक्षात घेता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि सहकारी साखर कारखान्यांच्या शाश्वत विकास आणि सक्षमतेसाठी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता साखर उद्याेगातील उपउत्पादनांपासून उच्च मूल्य असलेली (मूल्यवर्धित) उत्पादने तयार करून चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणे हा मागचा उद्देश आहे.
याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती सुनेत्रा पवार, नामदार चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, शिवेंद्रसिंहराजे भाेसले, हसन मुश्रीफ, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जून महिन्यात इचलकरंजी येथे कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बहुराज्य वर्गीकृत बँकेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन व जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार कार्यक्रमप्रसंगी नामदार अमित शाह यांनी काेल्हापूर जिल्ह्यात सहकार तत्वावरील एक माेठा प्रकल्प राबविणार असल्याची घाेषणा केली हाेती. आता हा प्रकल्प हुपरी येथे सुरु करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये नॅशनल काे-ऑप. डेव्हलपमेंट कार्पाेरेशन, इंडियन ार्मर्स फर्टीलायझर काे-ऑप. लि; कृषक भारती काे-ऑप.लि; नॅशनल काे-ऑप. एक्स्पाेर्टसब लि; नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बाेर्ड आणि गुजरात काे-ऑप. मिल्क मार्केटींग तसेच इंडियन पाेटॅश आदी सहकार तत्वावरील संस्थांची गुंतवणूक असणार आहे. हा प्रकल्प वेस्ट टू बेस्ट या तत्वावर असणार आहे. साखर उद्याेगातील बगॅस, मळी, स्पेंट वाॅश आदी घटकांवर प्रक्रिया करुन केली जाणार आहे. त्यापासून भारतात आयात करावे लागणारे पाेटॅश, सायट्रीक अॅसिड, सीबीजी गॅस आदींची निर्मिती हाेणार असल्याने परकिय चलनात माेठी वाढ हाेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या विकसित भारत तत्वावरील हा प्रकल्प आवाडे जवाहर कारखाना कार्यस्थळावर हाेणार आहे ही आनंदाची गाेष्ट आहे असा उल्लेख आवाडे यांनी केला.
पत्रकार परिषदेत इंडीयन पाेटॅशचे व्हाईस प्रेसिडेंट नरेश शर्मा, केन अॅडव्हायझर डाॅ. मल्लालीला, भानुजी, हर्ष मलिक, मार्केटींग मॅनेजर सयाजी पाटील आदींसह जवाहर कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासाे चाैगुले, प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, बाळासाहेब माने, माैश्मी आवाडे, सानिका आवाडे, महापाैर उदय धातुंडे, उपमहापाैर अनिल डाळ्या, नरसिंह पारीक, सतिश मुळीक, महेश पाटील, शशिकांत माेहिते आदींसह मान्यवर उपस्थित हाेते.