SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बिहारच्या राज्यपाल भवनात डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली पशुधन आरोग्य व दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी गोकुळ-सिद्धगिरी पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संयुक्त बैठक संपन्नमंत्री दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, यांनी घेतली पद्मश्री डी. वाय. पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेटएमआरपीपेक्षा जादा दर आकारल्यास तक्रार करा वैध मापनचे ग्राहकांना आवाहनशासकीय दंत महाविद्यालयातील अत्याधुनिक मध्यवर्ती सभागृह, मुखरोगनिदान व क्ष-किरणशास्त्र विभागाचे लोकार्पणछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरात 7 ऑगस्टपासून खासगी वाहनांना प्रवेशबंदीडॉ. डी. वाय. पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात शोकसभाजागतिक हिरोशिमा दिन: मानवी इतिहासातील काळा दिवस आणि शांततेचा संदेशवक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेमेहनत हाच यशाचा मार्ग : विनायक भोसले; संजय घोडावत विद्यापीठात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

जाहिरात

 

एमआरपीपेक्षा जादा दर आकारल्यास तक्रार करा वैध मापनचे ग्राहकांना आवाहन

schedule06 Aug 26 person by visibility 138 categoryराज्य

कोल्हापूर : ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि ग्राहकांना योग्य प्रमाणात व योग्य किमतीत वस्तू मिळाव्यात यासाठी वैध मापन शास्त्र विभागामार्फत बाजारातील वजने-मापे, इलेक्ट्रॉनिक व मेकॅनिकल काटे, तसेच पेट्रोल पंपांची नियमानुसार पडताळणी व मुद्रांकन केले जाते. तसेच आवेष्टित वस्तूंची छापील कमाल किरकोळ किंमत (MRP) पेक्षा अधिक दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जाते.

जिल्ह्यात काही ठिकाणी दूध, शीतपेये, कोल्ड्रिंक्स आदी वस्तूंवर 'कूलिंग चार्ज', 'फ्रिज चार्ज' किंवा तत्सम कारणे देत एमआरपीपेक्षा अधिक दर आकारला जात असल्याच्या तक्रारी राष्ट्रीय उपभोक्ता हेल्पलाइनमार्फत प्राप्त होत आहेत. विशेषतः लहान दुकानांमध्ये खरेदीची पावती न दिल्यामुळे ग्राहकांकडे अतिरिक्त आकारणीचा पुरावा राहत नाही आणि तक्रार करणे कठीण होते.

एमआरपीपेक्षा अधिक दराने वस्तूंची विक्री करणे कायद्याने बेकायदेशीर असून ग्राहकांनी अशा प्रकारांबाबत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रारींसाठी ग्राहकांनी राष्ट्रीय उपभोक्ता हेल्पलाइनच्या टोल फ्री क्रमांक 1800 11 1915, ई-मेल acimkolhapur@yahoo.in, अथवा उप नियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग, 1845, सी-वॉर्ड, हत्तीमहल रोड, मटन मार्केटजवळ, कोल्हापूर – 416002, दूरध्वनी 0231-2547567 येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप नियंत्रक ज्योती पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes