SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहातडॉ.डी .वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाला विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदसंजय घोडावत आय बी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले 'कृषीवा' शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण'केआयटी' चीन मधील दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी 'कनेक्ट' होणार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा वेध घेऊन क्षितिज विस्तारडीकेटीईचे एन.एस.एस. शिबीरामध्ये ‘महिलांच्या आरोग्याविषयी’ जनजागृतीदुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा : प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोरशिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न, ...पण वेबसाईट सुरक्षितशिवाजी विद्यापीठाकडून विज्ञानजगताला नवा सिद्धांत आणि समीकरणाची देणगी; प्रा. ज्योती जाधव, शुभम सुतार यांनी मांडली ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ आणि ‘शुभज्योत समीकरण’प्रजासत्ताक दिनी आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते ध्वजारोहण"नवजीवन क्लिनिक" चा पहिला वर्धापनदिन उत्साहात

जाहिरात

 

उत्कृष्ट लघुउद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करा

schedule03 Dec 24 person by visibility 218 categoryउद्योग

कोल्हापूर : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगाशी निगडीत विविध योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यातील स्थायीरित्या लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग घटकाकडून जिल्हा पुरस्कार योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उद्योग घटकाने विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे दि. 31 डिसेंबर 2024 पूर्वी जिल्हा उद्योग केंद्रास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील यांनी केले आहे.

पुरस्कारासाठी अटी खालील प्रमाणे-
पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षास पात्र लघुउद्योग घटकांना देण्यात येतील उदा. वैयक्तिक मालकास किंवा फर्मच्या भागिदारास किंवा खासगी मर्यादित कंपनीच्या कोणत्याही संचालकास जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे तसेच उद्योग घटक संचालनालयाकडे, उद्योग खात्याकडे स्थायीरित्या लघुउद्योग म्हणून नोंदणीकृत झालेला असला पाहिजे. मागील तीन वर्षात सलग उत्पादन व किमान निव्वळ नफा करत असणारे घटक पुरस्कारास पात्र ठरतील. याकामी विहित नमुन्यात पात्र घटकाकडून मागील 3 वर्षाची वर्षनिहाय माहिती अपेक्षित राहील. उद्योग घटकाची सर्वांगीण प्रगती झालेली असावी. उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. उद्योग घटकास राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला नसावा.
पुरस्कार योजनेत यशस्वी उद्योग घटकांना अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशंसा पत्र, शाल व श्रीफळ पुरस्काराच्या स्वरुपात दिले जातात. 

विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर कार्यालयाकडे संपर्क साधावा, असेही पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes