भाजपा आयोजित नमो युवा रनला उत्स्फूर्त प्रतिसाद
schedule21 Sep 25 person by visibility 246 categoryक्रीडा

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोंबर पर्यंत संपूर्ण देशभरात भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये अनेक सामाजिक उपक्रमांचा सहभाग आहे. याच धर्तीवर आज भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर आयोजित नमो युवा रनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस ग्राउंड या ठिकाणी सकाळी 6 : 30 वाजता हजारांहून अधिक धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. यामध्ये लहान मुलांपासून, वयोवृद्ध नागरिकांचा देखील सहभाग होता.
झुंबा डान्स, ग्रामीण खेळ यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले.
खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष नाथजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नमो युवा रनला झेंडा दाखवून मेरेथॉनला सुरवात झाली.
या मॅरेथॉन ची सुरुवात पोलिस ग्राउंड येथून होऊन पितळी गणपती, धैर्यप्रसाद मंगल कार्यालय, ताराराणी चौक पासून पुन्हा पोलिस ग्राउंड याठिकाणी करण्यात आली.
स्पर्धेतील सर्वांना प्रशस्तीपत्र आणि मेडल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
प्रारंभी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी शहरात सुरू असणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणामध्ये भारतीयांमध्ये ओबेसिटीचे प्रमाण म्हणजे लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याची चिंता व्यक्त केली होती. परंतु फक्त चिंता व्यक्त करून थांबणारे पंतप्रधान नाहीत तर त्यांनी या चिंतेवर कृती म्हणून योगा आणि सकस आहार, क्रीडा या गोष्टींना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे आजचा हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'रन फॉर इंडिया, फिट इंडिया, नशा मुक्त भारत' या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम समाजात एकतेचा, आरोग्याचा आणि नशामुक्तीचा संदेश देणारा ठरत आहे असे नमूद केले.
त्याचबरोबर नमो युवा रन ही क्रीडा स्पर्धा तरुणाईला आरोग्य, सामाजिक जागृती आणि राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने प्रेरणा देणारा उपक्रम आहे. मोदीजींच्या नेतृत्वात आजचा युवा समाजनिर्मितीसाठी पुढे यातना पाहणे हा कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण आहे.
सदर मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी संयोजक भाजपा युवा महानगर अध्यक्ष विश्वजीत पोवार, ग्रामीण युवा अध्यक्ष रविश पाटील कौलावकर, पूर्व युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत बुगले यांच्यासह सुमित पारखे, युवराज शिंदे, भूषण कानकेकर, अनिकेत मुतगी, अनिकेत अतिग्रे, ओंकार खराडे, उमेश पाटील सर, निरंजन घाटगे, रोहित कारंडे, वल्लभ देसाई, बालाजी चौगले यांच्यासह अनेक युवा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी विराज चिखलीकर, अमर साठे, प्रसाद जाधव, विजय आगरवाल, विशाल शिराळकर, धीरज पाटील, अप्पा लाड, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, राजसिंह शेळके, विजय खाडे, अशोक कोगनूळकर, रोहित पोवार, संजय जासूद, डॉ.राजवर्धन, सयाजी आळवेकर यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.