SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजनशिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

जाहिरात

 

हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोध

schedule11 Mar 26 person by visibility 127 categoryराज्य

कोल्हापूर : नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीला घवघवीत यश मिळाले. २२ सदस्य संख्या असणाऱ्या हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिवसेना भाजपाचे तब्बल १७ सदस्य निवडून येत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानुसार आज सभापती व उपसभापती निवडी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख रवींद्र माने, मा.जि.प सदस्य अरुणराव इंगवले, मा.सभापती राजेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्या पुढाकाराने व सहकार्याने बिनविरोध पार पडल्या.

निवडणूक प्रक्रिया तहसीलदार  सुशील बेलेकर, गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडली. 

 निवडी नंतर नूतन सभापती पदी व उपसभापती पदी यांना   मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत जि.प. सदस्य अतिश शिंगे, वर्षाताई सावर्डेकर, शिवाजी जाधव, मा.जि.प सदस्य प्रसाद खोबरे,सरपंच अजिंक्य इंगवले,राजु इंगवले, अनिल बिरांजे, अमर इंगवले,विजय भोसले, अमोल कोरे, झाकीर भालदार, पापा सनदी, गोगा बाणदार, किसन तिरपणकर, आनंदा मोरे, तसेच शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes