SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे जाळे अधिक मजबूत करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​"मोसमी पावसाचे राज्यात आगमन, मात्र सर्वदूर सक्रियतेसाठी १५ जूनची प्रतीक्षा; बळीराजाची नजर आकाशाकडे!"डीकेटीईच्या ६ विद्यार्थ्यांची क्लिंजनबर्ग कंपनीत वार्षिक सहा लाख पॅकेजवरती निवडअवर्षण परिस्थितीत ऊस पीक संवर्धनाबाबत आवाडे कारखान्याचा शेतकरी मेळावाकरिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास सहकाराचा इतिहास 'दत्ताजीराव कदमां'शिवाय अपूर्ण; शरद पवारांकडून कार्याचा गौरवदूरशिक्षण केंद्राच्या एमबीए प्रवेश प्रक्रिया फेरीचे आयोजन जागतिक अन्न सुरक्षा दिन: सुरक्षित अन्न, निरोगी आरोग्य!दूध संकलन व गुणवत्तावाढीसाठी समन्वयातून काम करण्याची गरज : प्रदीप मालगावे‘गोकुळ’ मध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

जाहिरात

 

​"मोसमी पावसाचे राज्यात आगमन, मात्र सर्वदूर सक्रियतेसाठी १५ जूनची प्रतीक्षा; बळीराजाची नजर आकाशाकडे!"

schedule07 Jun 26 person by visibility 112 categoryराज्य

मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

◼️कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :
▪️आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.
▪️ विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes