SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात 'आजी-माजी विद्यार्थी-पालक मेळावा' उत्साहातघरफाळा दंड सवलत योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 1.22 कोटींची वसुलीहत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत" योजना प्रभावीपणे राबवा : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरसावधान! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; बळीराजाची धाकधूक वाढली!'सहज सेवा ट्रस्ट'चे ज्योतिबा डोंगरावर सलग २६ व्या वर्षी भव्य अन्नछत्र; यंदा दोन लाख भाविकांना मिळणार महाप्रसाद!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे शनिवारी 'अर्थ अवर'चे आयोजनमाती आधारित शिक्षणाने विश्वाचे कल्याण शक्य : मल्लिकार्जुन कोरी; केआयटी मध्ये कै.शिवाजीराव देसाई व्याख्यानमाला संपन्न.‘गोकुळ’ परिवारामार्फत नामदार हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजराडॉ. जयसिंगराव पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; इतिहासाचे समृद्ध पान अनंतात विलीन

जाहिरात

 

सावधान! ३०-३१ मार्चला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; बळीराजाची धाकधूक वाढली!

schedule26 Mar 26 person by visibility 87 categoryराज्य

मुंबई : सध्या राज्यातील काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे.

30 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. 31 मार्च रोजीदेखील राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes