ज्येष्ठ चित्रपट, नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन
schedule18 Mar 23 person by visibility 231 categoryसामाजिक

कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी (वय ८८) यांचे आज कोल्हापूर येथे राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. सकाळी सहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
मुंबईचा जावई, पिंजरा, सोंगाड्या, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसले, जावयाची जात यासह ३०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे.
त्यांच्यावर कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्काराने गौरवले होते.