SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित शुभेच्छाचा वर्षावशेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील उत्पन्न वाढवावीवडनेरे समितीचा अहवाल मान्य असेल तर महापुरावर काय उपायोजना केल्या; खा. शाहू छत्रपती, आ. सतेज पाटील यांची विचारणा; जलसंपदामंत्र्यांना पाठवले पत्रबेकायदा होर्डिंग्ज,बोर्ड, बॅनर, फ्लेक्स चा सुळसुळाट; कोल्हापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष राज्य शासनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूरप्रजेचे सुख व त्यांचे घर हीच खरी राज्याची तिजोरी : अहिल्याबाई होळकरकळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरात इंडिया आघाडीची बैठक कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती : जनजागृतीसह कारवाईचे निर्देशदूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध : चेअरमन, नविद मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात 12 जून पर्यंत मनाई आदेश जारी

schedule30 May 25 person by visibility 263 categoryराज्य

कोल्हापूर :  जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 12 जून 2025 रोजी रात्रौ 12.00 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.

हा हुकूम सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes