भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित
schedule10 Apr 26 person by visibility 81 categoryराज्य
कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंतीनिमित्त मंगळवार 14 एप्रिल रोजी सायं. 6 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे साजरा करण्यात येणार आहे.
यावर्षी जेष्ठ पत्रकार मधु कांबळे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत सामाजिक लोकशाही किती पाऊले पुढे किती मागे? या विषयावर व्याख्यान होणार आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव गजानन गुरव हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. करवीरवासीयांनी या व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.