इचलकरंजी शहरातील कबनूर मार्गावर युवकाचा निघृण खून
schedule28 Oct 25 person by visibility 175 categoryगुन्हे
कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील कबनूर मार्गावरील पेट्रोल पंपासमोर मध्यरात्रीच्या सुमारास अभिनंदन जयपाल कोल्हापूरे (वय ४४, रा. इंदिरानगर, कबनूर) या युवकाचा डोक्यात दगड आणि सिमेंट पाईप घालून निघृण खून करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
सोमवारी (ता. २७) रात्री अभिनंदन कोल्हापुरे हे कोल्हापूर रोडवरील एका बारमध्ये दारू पिण्यास गेले होते. तेथे वेटरशी किरकोळ वाद झाल्यानंतर ते बारमधून बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच वेळात पेट्रोल पंपासमोर त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून डोक्यात दगड आणि सिमेंट पाईपने हल्ला करून ठार केले. पहाटे रात्री दोनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तो खासगी बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.