करवीर नगरीमध्ये कॅबिनेट मंत्री मुश्रीफ, आबिटकर यांचे जोरदार स्वागत
schedule21 Dec 24 person by visibility 305 categoryराज्य
कोल्हापूर : कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आज, शनिवारी महायुतीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी आणि आतिषबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
मंत्री मुश्रीफ व मंत्री आबिटकर हे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले त्यांच्या स्वागताची राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेसेनेसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली होती. मंत्री मुश्रीफ व मंत्री आबिटकर हे रैलीच्या अगोदर सकाळी दहा वाजता करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
त्यानंतर दोन्ही मंत्री ताराराणी चौकात आल्यानंतर तेथून रॅलीला सुरुवात झाली. व्हिनस कॉर्नर मार्गे दसरा चौकात रॅली आल्यानंतर तिथे राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले तेथेच आभार सभा होऊन रॅलीची सांगता झाली त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी बिंदचौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले यांना अभिवादन करून शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन अभिवादन केले.
रॅलीमध्ये महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.