+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule26 Jun 24 person by visibility 247 categoryउद्योग
कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राजर्षी छञपती शाहू महाराजांच्‍या १५० व्‍या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते व संचालकसो यांच्‍या उपस्थितीत राजर्षी छ.शाहू महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करून उपस्थित सर्वाना राजर्षी शाहू जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले कि, शेतकरी आपली शेती पारंपारिक पद्धतीने करण्याऐवजी आधुनिक तंत्राने शेती करायला हवी असे शाहू महाराजांना वाटायचे. त्यांनी शेतीला आधुनिक संसाधनाची जोड देऊन शेती विकासाला मोलाचे योगदान दिले. यासाठी शेतीविषयक प्रदर्शने आयोजित करून मार्गदर्शन केले. याबरोबर शेतीला पाण्याची अत्यंत गरज आहे, पाणी असेल तरच शेती पिकते म्हणून राधानगरी सारखे धरण उभारून शेतीचा बारमाही पाण्याचा प्रश्न सोडवला. शेतीबरोबरच जोड व्यवसाय करावा याकडे राजर्षी शाहूंनी लक्ष दिले जनावरांची पैदास गाई म्हशींच्या माध्यमातून दुग्ध उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सहकारातून विकास होतो हा महाराजांचा दृढ विश्वास होता म्हणून त्यांनी सहकारी संस्था विषयी कायदा केला असे मनोगत व्यक्त केले.

 यावेळी संघाचे संचालक अजित नरके यांनी आपले मनोगत व्यक्त केले व एम.पी.पाटील यांनी आभार मानले.

 यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक अजित नरके, सुजित मिणचेकर, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, वित्त व्यवस्थापक हिमांशू कापडिया, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ.पी.जे.साळुंखे, डॉ.प्रकाश दळवी, संकलन सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, बी.आर.पाटील, प्रकाश आडनाईक, बी. एस. मुडकशिवाले, संग्राम मगदूम, लक्ष्मण धनवडे, विनोद वानखडे संघाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.