+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule30 Jan 24 person by visibility 395 categoryविदेश
कोल्हापूर : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत बुधवार 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान कोल्हापुरातील बागल चौकातील श्री शाहू छत्रपती मिल येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह कला दालनांचा समावेश असणाऱ्या महासंस्कृती महोत्सवात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे व नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करुन द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

राज्यभरातील प्रत्येक भागातील विविध कला, संस्कृतीचे प्रदर्शन घेणे तसेच लुप्त होणाऱ्या कलांचे संवर्धन करणे व त्यांना चालना देण्यासाठी तसेच विविध कारागिरांच्या कलाकुसरीचे सादरीकरण करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत आहे.

 शाहू मिल मध्ये होणाऱ्या या महासंस्कृती महोत्सवात लोककला सादरीकरण, महाराष्ट्राच्या पाऊलखुणा, गौरव मायमराठीचा, दास्ता ए हिंदुस्थान, शाहिरी व लोककला सादरीकरण, जागर लोककलेचा, मुद्राभद्राय राजते, गाथा शिवशाहीची, गुढी महाराष्ट्राची, स्वराज्य संस्थापक (श्रीमंतयोगी) हे कार्यक्रम सादर होणार आहेत.  

   महोत्सवात महाराष्ट्र संस्कृती दर्शन दालन, शिवकालीन आज्ञापत्रे व इतर पत्रव्यवहार दालन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दालन, गडकोट किल्ले छायाचित्र प्रदर्शन दालन, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन दालन, पारंपरिक वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला प्रदर्शन (बांबूकाम) दालन, कृषीविषयक उत्पादन दालन, पर्यटक विषयक दालन, हस्तकला प्रदर्शन (मातीकाम) दालन व ऐतिहासिक पुस्तके, ग्रंथ दालन अशी विविध कलादालने 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहेत, या महोत्सवात आपण सहकुटुंब, सहपरिवार, नातलग व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.

🟡 महासंस्कृती महोत्सवात सादर होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
▪️दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी शाहिरी व लोककला सादरीकरण - दुपारी 4 ते सायं. 6 पर्यंत व महाराष्ट्राच्या पाऊलखुणा सायं. 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत.

▪️दिनांक 1 फेब्रुवारी 2024 गौरव मायमराठीचा कार्यक्रम दुपारी 4 ते सायं. 6 वाजेपर्यंत व दास्ता ए हिंदुस्थान सायं. 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत.

▪️दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी शाहिरी व लोककला सादरीकरण दुपारी 4 ते सायं. 6 पर्यंत व जागर लोककलेचा कार्यक्रम सायं. 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत.

▪️दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी मुद्राभद्राय राजते गाथा शिवशाहीची कार्यक्रम दुपारी 4 ते सायं. 6 वाजेपर्यंत व गुढी महाराष्ट्राची कार्यक्रम सायं. 6 ते 9 वाजेपर्यंत. 

▪️दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी स्वराज्य संस्थापक (श्रीमंतयोगी) कार्यक्रम सायं. 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत होणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.