SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत 'शाहिरी बाणा' कार्यक्रमओंकार जाधव यांच्या प्रचारार्थ सिरत मोहल्ला परिसरामध्ये प्रचार फेरीमहायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा जयघोष, शेकडो समर्थकांच्या सहभागाने सत्यजित जाधव यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फेरी, खासदार धनंजय महाडिक यांचा सहभागगजेंद्र प्रतिष्ठानकडून विद्यापीठास आबा देशपांडे यांच्या स्मरणार्थ देणगीडिजिटल युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ई-कन्टेन्ट अपरिहार्य ; अभिजित रेडेकरवंचितांच्या जगण्याचा इतिहास सामोरा यावा ; प्रा. ज्ञानेंद्र पांडेयसंजय घोडावत इन्स्टिट्यूट, डिप्लोमा इंजिनिअरिंग “हिवाळी परीक्षेत उच्चांकित निकालाची परंपरा कायम”प्रभाग क्रमांक 11 मधील सत्यजीत जाधव यांच्या प्रचारार्थ सिद्धाळा, टिंबर मार्केट परिसरात प्रचार फेरीसन्मान योजनेसह शासन दरबारी पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवणार ; आमदार सतेज पाटील यांची ग्वाही भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेवून आजमावली मते

जाहिरात

 

खोट्या बिलांद्वारे रू. ६४.०६ कोटीच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक

schedule10 Dec 24 person by visibility 515 categoryगुन्हे

मुंबई : शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून वस्तू व सेवाकर चुकवेगिरी संदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिन्स गोयल, वय ५३ वर्षे यांस दि. ०२ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त यांनी दिली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीवर वस्तू व सेवा कर विभागाकडून अन्वेषण कार्यवाही सुरू करण्यात आली होती. या संदर्भातील तपासात कंपनी प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू व सेवांचा पुरवठा न करता खोटी बिले आणि बोगस वाहतूक पावत्या जारी करत असल्याचे आढळून आले. त्याद्वारे कंपनीने रूपये ६४.०६ कोटीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करून शासनाची फसवणूक केली आहे.

मे. एसपीजी मल्टी ट्रेड प्रा.लि. या कंपनीच्या सर्व कामकाजास व व्यवहारास जबाबदार असल्यामुळे प्रिन्स गोयल यांचा या फसवणूकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळून आहे. ही संपूर्ण कार्यवाही षण्मुगाराजन एस. (भा.प्र.से.), राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण-क तसेच नयना गोंदावले, राज्यकर उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, विलास नाईक आणि अजित विशे, सहायक राज्यकर आयुक्त यांच्याकडून संयुक्तपणे राबविण्यात आली. या कार्यवाहीत राज्यकर निरीक्षकांचे उल्लेखनीय योगदान आहे.

सन २०२४-२५ मध्ये केलेल्या या ९ व्या अटकेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना कठोर इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes