+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule27 Jun 24 person by visibility 460 categoryदेश
कोल्हापूर : कोणताही पुरावा नसताना अत्यंत क्लिष्ट असा खुनाचा गुन्हा उघड करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपी अटक करून रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 15,40,000/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने ही कारवाई केली. प्रकाश सोमाप्पा चव्हाण, राजू वालाप्पा नायक, यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे

जयसिंगपूर पोलीस ठाणेचे हद्दीत कवठेसार, (ता. शिरोळ) गांवचे हद्दीत वारणा नदीत दि.21.06.2024 रोजी एका वयस्कर महिलेचा मृतदेह बारदानाचे पोत्यात बांधून टाकलेली व ती सडलेले अवस्थेत मिळुन आला. सदरचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असलेने ओळख पटली नाही. तसेच सदर महिलेच्या उजव्या हातावर राम लक्ष्मण जोडी व बाशिंगचे गोंदण तसेच गळयामध्ये दोन तावीज याच गोष्टी होत्या. मयताची ओळख पटविणेकरीता फिंगर प्रींट ऑपरेटर यांचेकडून मयताचे फिंगरप्रींटची तपासणी केली परंतू मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत मिळुन आलेने फिंगरप्रींट मिळुन आल्या नाहीत. त्याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाणेकडुन प्राथमिक तपास करुन गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक इचलकरंजी निकेश खाटमोडे-पाटील , जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीमती रोहिणी साळुंखे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व जयसिंगपूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेटी दिल्या. 

सदरची बाब ही गंभीर स्वरुपाची असलेने कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे व जयसिंगपूर पोलीस ठाणेचे सहा तपास पथके तयार करून मयत महिलेची ओळख पटवून सखोल तपास करणेकरीता योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.

 पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचेसह एकूण पाच तपास पथके तयार करून सदर मयत प्रकरणाचा समांतर तपास चालू केला. तपासामध्ये मयत महिलेचा चेहरा ओळखत नव्हता मृत महिलेची ओळख पटवून तपास करणे याबाबत पोलीसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मृत महिलेचे प्रेत मिळाले पासून वारणा नदीचे पात्र येणारे मार्गावरुन नदीचे दोन्ही बाजूचे कोल्हापूर व सांगली जिल्हयातील गांवोगांवी जावून वयस्कर महिला कोणी बेपत्ता आहे अगर कसे याबाबत सातत्याने अहोरात्र तपासकार्य चालू ठेवले. तसेच नदीच्या आजूबाजूला येणाया मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिरे, दर्गा या ठिकाणीदेखील तपास पथके तपास करीत होती.

दि. 26 रोजी रोजी तपास पथकास गोपनीयरित्या माहिती मिळाली की, चंदूर येथील एक मुस्लीम वयस्कर महिला ही 10 ते 12 दिवसांपासून दिसून येत नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक मोरे व दोन पथके यांनी चंदूर येथील गावात जावून गोपणीयरित्या माहिती घेतली असता 1 वर्षापुर्वी मुंबई येथून जरीना बेगम ही महिला तिचे नातेवाईकांकडे राहणेस आली होती परंतू अचानक ती गायब झाली आहे. मिळालेल्या माहितिचे आधारे तिचे नातेवाईकाकडे व शेजारी तपास करीत असताना सर्व माहिती ही संदिग्ध स्वरुपात मिळत होती म्हणून मयतेचे बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण यास ताब्यात घेवून सखोल तपास केला असता मयत महिला नामे जरीना बेगम मोहमंद युसुफ खान, अंदाजे वय 64 वर्षे रा. नागपाडा मुंबई (मुळ नांव शिवाली राठोड, मुळ गांव बागलकोट) ही तिचे वडीलासह ति लहानपणापासून चंदूर ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे राहणेस होती. तिने सुमारे वीस वर्षापुर्वी प्रेमविवाह करून मुंबई येथे गेली. लग्नानंतर जरीना बेगम ही तिचे पतीसमवेत नागपाडा मुंबई येथे पतीचे स्वतःचे मालकीचे घरी राहत असताना अडीचवर्षापुर्वी तिचा पती मयत झाला. पतीचे निधनानंतर तिचे मालकीचे खोलीकरीता तिला पतीचे इतर नातेवाईक त्रास देत होते. मयतेस मुल नव्हते व तिचे आईवडीलही मयत झाले होते म्हणून तिने सदरची घटना तिचे बहिणीचा मुलगा प्रकाश सोमाप्पा चव्हाण, रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यास सांगीतली. त्यानंतर प्रकाश चव्हाण याचे सांगणेप्रमाणे मयत जरीना बेगम हीने मुंबई येथील पतीचे नांवे असलेली खोली 28,00,000/- रुपयास विक्री करुन मिळालेले पैशासह ती मुंबई येथून निघून तिचे बहिणीचा मुलगा प्रकाश चव्हाण याचेकडे चंदूर, ता. हातकणंगले येथे गेले 1 वर्षापासून राहणेस होती. मयत जरीना बेगम हीला त्वचारोग होता तिचेकडे खोली विक्रीचे पैसे होते. तिला ठार मारले तर तिचेपासून होणारा त्रास कमी होईल व तिचे पैसे आपणास मिळतील या उद्देश्याने मयतेचे बहिणीचा मुलगा प्रकाश सोमाप्पा चव्हाण, वय 37, रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर याने दि. 11 जून रोजी रात्रौंचे वेळी जरीना बेगम हिला 4 झोपेच्या गोळया दिल्या व तिचा गळा आवळून तिला ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करणेचे उद्देश्याने मयत जरीना बेगम हिचे प्रेत त्याचा मित्र राजू नायक याचे मदतीने बारदान्याच्या गोणीत घालून त्याचे पल्सर मोटर सायकवरुन नेवून ते कुंभोज ते दुधगांव जाणारे रोडवर असले वारणा नदीचे पुलावरुन नदीत टाकले असलेचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा दुसरा साथीदार नामे राजू वालाप्पा नायक, वय 36, रा. डीकेटी कॉलेज जवळ आसरानगर इचलकरंजी यास ताब्यात घेतले.

आरोपी 01) प्रकाश सोमाप्पा चव्हाण, व.व.37, रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर व 02) राजू वालाप्पा नायक, व.व.36, रा. डीकेटी कॉलेज जवळ आसरानगर इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांचेकडे सखोल तपास करून त्यांचेकडून मयत जरीना बेगम हिने खोली विक्री करुन शिल्लक राहीलेले 14,50,000/- रुपये रक्कम व गुन्हा करणेकरीता वापरलेली पल्सर मोटर सायकल असा एकूण 15,40,000/- रु किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे. जप्त मुद्देमालासह दोन्ही आरोपींना जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाणे करत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, जयसिंगपूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे तसेच पोलीस अमंलदार प्रकाश पाटील, सतिश जंगम, प्रशांत कांबळे, संजय इंगवले, अमित सर्जे, महेश खोत, राजेंद्र कांबळे, रफिक आवळकर, यशवंत कुंभार, आयुब गडकरी, संजय पडवळ जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील अमोल अवघडे, गावभाग पोलीस ठाणेकडील शिवानंद पाटील, जयदिप बागडे व सायबर पोलीस ठाणेकडील विक्रम पाटील यांनी केले आहे.