+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule13 Jul 24 person by visibility 451 categoryदेश
नवी दिल्ली : सात राज्यांमधील १३ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. या निवडणुकीचे सगळे निकाल आज जाहीर झाले असून, त्यात केवळ २ ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आला. तर काँग्रेसने ४ आणि इंडिया आघाडीमधील घटक पक्षांनी ६ मतदारसंघात विजय मिळवला.

निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक झालेल्या तेराही मतदारसंघामधील निकाल जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये बिहारमधील रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवार शंकर सिंह हे विजयी झाले आहेत. तर हिमाचलप्रदेशमध्ये पोटनिवडणूक झालेल्या तीन पैकी दोन मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली आहे. हिमाचल प्रदेशमधील देहरा मतदारसंघातून काँग्रेसच्या कमलेश ठाकूर ह्या विजयी झाल्या आहेत. तर नलगड मतदारसंघातून काँग्रेसचे हरदीप सिंह बावा हे विजयी झाले आहेत. मात्र हमीरपूर मतदारसंघात भाजपाच्या आशिष शर्मा यांनी विजय मिळवला.

 मध्य प्रदेशमधील अमरवाडा विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या कमलेश प्रताप सिंह यांनी विजय मिळवला. तर पंजाबमधील जालंधर पश्चिम मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या मोहिंदर भगत यांनी बाजी मारली. तामिळनाडूमध्ये विक्रावंडी मतदारसंघातून डीएमकेच्या ए. शिवा यांनी विजय मिळवला.

उत्तराखंडमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली. येथे बद्रिनाथ मतदारसंघात काँग्रेसचे लखपत सिंह बुटोला विजयी झाले. तर मंगलोर मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत काँग्रेसचे काझी मोहम्मद निजामुद्दीन विजयी झाले.

पश्चिम बंगालमध्येही विधानसभेच्या ४ जागांसाठी मतदान झालं. त्यामध्ये चारही जागांवर तृणमूल काँग्रेसचा विजय झाला. राणीगंजमध्ये तृणमुलचे उमेदवार कृष्णा कल्याणी, राणीघाट दक्षिण मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे मुकुट मणी अधिकारी, बागदा मतदारसंघात तृणमूलच्याड मधुपर्णा ठाकूर आणि मणिकटला मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या सृप्ती पांडे या विजयी झाल्या.