SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आगामी निवडणूका मधील उमेदवारांनाही रेड्याची टक्कर स्मृती शिल्प स्फुर्तीदायी : आमदार सतेज पाटीलडी. वाय. पाटील विद्यापीठाच्या संशोधकांचा राष्ट्रीय विज्ञान मंचामध्ये सहभाग कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईकोल्हापूर : शिरोली जकात नाक्यातील जुना डिव्हायडर हटविण्याचे काम महापालिकेच्यावतीने सुरूकागल मधील निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांनी माफ करावे : भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलकेआयटी ‘बेस्ट नॉलेज सेंटर’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित; आय.एस.टी.ई.च्या वतीने सन्मानकोल्हापूर : गुंठेवारी विकास अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर अखेर कोल्हापूर जिल्ह्यात 12 शेतकरी नोंदणी केंद्रे सुरुमंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ध्यानातून अनुभूती; सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामींचे समर्पण ध्यान योग शिबीर संपन्नपुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा : राज्यपाल आचार्य देवव्रत; राज्यपालांच्या हस्ते नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटन

जाहिरात

 

कोल्‍हापूरात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी : प्रसाद संकपाळ

schedule10 Jun 24 person by visibility 630 categoryसामाजिक

कोल्‍हापूर : कोल्‍हापूरात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी असे प्रतिपादन आपत्ति व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी आज केले. 90.4 मँगो एफ एम, युनिसेफ आणि स्‍मार्ट यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित पाणी बचत काळाची गरज या जलसंवर्धन विषयी कार्यक्रमात ते बोलत होते. 

कोल्‍हापूर सारख्या ठिकाणी पाणी बचतीची गरज आहे काय असा काही जणांना प्रश्न पडेल. मात्र आज मुबलक स्‍वरूपात पाणी उपलब्ध असले तरी भविष्यात कोल्‍हापूर सारख्या शहरांना सुध्दा पाणी बचत व सवंर्धन करणेचे गरजेचे होईल अशी चिंता व्‍यक्‍त करीत आज पाणी बचतीसाठी केलेली ही सुरूवात पाणी बचतीची चळवळ निर्माण व्‍हावी असे त्‍यांनी स्पष्ट केले.

पर्यावरण संरक्षक अनिल चौगुले यांनी कोल्‍हापूरात आज जरी पाणी टंचाई नसली तरी भविष्यात पाणी टंचाई निर्माण होवू नये यासाठी आजपासूनच कामाला लागणे गरजेचे असल्‍याचे यावेळी बाेलतांना नमूद केले.

युनिसेफचे कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे समन्‍वयक आदित्‍य जाधव यांनी पाणी बचत ही काळाची गरज असून त्‍यासाठी व्‍हाय वेस्‍ट हे ॲपच्‍या माध्यमातून युवकांनी पाणी बचतीचा मार्ग धरावा व इतरांना त्‍याची माहिती देवून देशकार्यास हातभार लावावा असे आवाहन यावेळी केले.

प्रा. वंदना यांनी पाणी व्‍यवस्‍थापन करून त्‍याचे संर्वधन हे शहरी भागात निश्चितच झाले पाहिजे नाहीतर भविष्यात आपणास मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल अशी भिती त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

एक नागरिक म्‍हणून येथे जमलेल्‍या प्रत्‍येकाला पाणी समस्‍येबाबत जागृकता आहे. पाणी प्रदूषण, पाण्याचा चुकीचा वापर व पाण्याचा अति वापर या तिन्‍ही गोष्टींकडे प्रत्‍येक नागरिकानी गांभिर्याने पाहिले पाहिजे. घरगुती व व्‍यावसायिक किवा इंडस्‍ट्रीयल वापर करताना त्‍याचे प्रदुषण होणार नाही याची प्रत्‍यकांने काळजी घ्यावी असे शिवाजी विद्यापीठाच्‍या पर्यावरण विभागाच्‍या प्रमुख डॉ.आसावरी जाधव यांनी या कार्यक्रमात आपले मत व्यक्‍त करतांना सांगितले.
बी न्‍यजचे वृत्‍तसंपादक विजय कुंभार यांनी पाणी बचत व संर्वधानाबरोबरच योग्‍य प्रकारची वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्‍याचे यावेळी स्‍पष्ट केले. 

डॉ.संदीप पाटील यांनी शहरात प्रत्‍येकाचे घरात बोरींग असून त्‍याला मुबलक पाणीसाठा आहे मात्र रेन वॉटर हार्वस्‍टींग सारख्या उपाययोजना न करतस जलसंवर्धानाकडे दुर्लक्ष केल्‍यास त्‍याचे द्षपरिणाम आपणास भेडसावतील असे मत व्‍यक्‍त केले.
या कार्यक्रमात व्‍हाईट आर्मीचे अशोक रोकडे, प्रा.बी.जी.मांगले, माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी आपली मते व्‍यक्‍त केली.
यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे, किशोर घाडगे, अंकुश निपाणीकर, सुमित साटम, ॲड.शिवाजी चौगुले, अनिता काळे, पल्लवी देसाई, प्रशांत शेंडे, सतिश वडणगेकर, अल्लाउद्दीन बागवान, संदीप संकपाळ, अमरसिंह पाटील, अनिल निगडे यांच्‍यासह अन्‍य मान्यवर उपस्‍थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र मकोटे यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes