SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सुवर्णझेप! मीराबाई चानूचा इतिहास; ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक!घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनपैशांअभावी शस्त्रक्रिया थांबणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडीकेटीईच्या २९ विद्यार्थींनींची कॅपजेमिनी या नामांकीत कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवरती निवडजिल्हाधिकारी कार्यालय येथे 27 वा कारगिल विजय दिवस साजराडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवडजलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार : जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील​"मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही"महसूल सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरकारगिल विजय दिवस: भारतीय शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचा सुवर्णदिन

जाहिरात

 

डी. वाय. पाटील विद्यापीठाला उर्जा साठवणूक पद्धतीसाठी पेटंट

schedule01 Dec 25 person by visibility 342 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट मिळाले आहे. विद्यापीठाला मिळलेले हे 58 वे पेटंट आहे. 

प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती थोरात, सूरज संकपाळ व डॉ. अभिषेक लोखंडे यांनी हे संशोधन केले.  ‘आरजीओ निकेल कोबाल्ट बेस्ड हाय एनर्जी डेन्सिटी अ‍सिमेट्रिक इलेक्ट्रोकेमिकल सुपरकॅपेसिटर डिव्हाइस’ या संशोधनामुळे  ऊर्जा साठवणुकीच्या क्षेत्रात नवे क्षितिज खुले झाले आहे.

ऊर्जा साठवणुकीसाठी बॅटरी व सुपरकॅपेसिटर डिव्हाइस विकसित करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. केमिकल बाथ डिपॉझिशन मेथड या सोप्या व कमी खर्चिक प्रक्रियेद्वारे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. 

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes