SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​"मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही"महसूल सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरकारगिल विजय दिवस: भारतीय शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचा सुवर्णदिनआषाढी एकादशीनिमित्त ‘गोकुळ’च्या दुधाची उच्चांकी विक्रीबालकांचे शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरलाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात कोल्हापुरात काँग्रेसचा कॅन्डल मार्चधर्मेंद्र प्रधान तडकाफडकी राजीनाम्यानंतर CJP चा मोठा विजय; जंतर-मंतरवरील धरणे आंदोलन अखेर मागे!‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शनबाल वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभागगोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत : उदय शिंदे यांचे आवाहन

जाहिरात

 

महसूल सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

schedule26 Jul 26 person by visibility 147 categoryराज्य

◼️कवठेगुलंद येथे १५ लाखांच्या निधीतून उभारलेल्या नूतन तलाठी कार्यालयाचे लोकार्पण

कवठेगुलंद : गावागावातील नागरिकांना शासकीय सेवांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी ग्रामीण भागात सुसज्ज शासकीय कार्यालयांची उभारणी आवश्यक आहे. तलाठी कार्यालय हे महसूल प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा असून, या कार्यालयामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची कामे अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने होतील, असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

कवठेगुलंद येथील नागरिकांच्या सोयीसाठी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन सुसज्ज तलाठी कार्यालय इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

नवीन कार्यालयामुळे परिसरातील शेतकरी, कष्टकरी आणि नागरिकांना सातबारा, फेरफार, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्रासह विविध महसूलविषयक कामांसाठी सुसज्ज आणि कायमस्वरूपी कार्यालय उपलब्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार असून, शासकीय सेवा अधिक गतिमान आणि प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

यावेळी आमदार डॉ. यड्रावकर यांनी कार्यालयाची पाहणी करून उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार शासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी विकासकामांना सातत्याने प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच संगिता शिंदे, आनंदा कुम्मे, श्रीकांत जगताप, विनोद जगताप, बाबासो पाटील, आदिनाथ आरबाळे, वसंत कुम्मे, राजेंद्र डवरी, मलाप्पा चौगुले, अविनाश कदम, मोहसीन वाळवेकर, सर्कल आरगे, गुरुपाद केटकाळे, तलाठी कुरने मॅडम यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes