+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustशेतकरी संघटना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात: ७ उमेदवार जाहीर; करवीरमधून अँड. माणिक शिंदे adjustकोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त adjustविधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही adjust‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना : नवीन ४००० बायोगॅस मंजुर; या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा : चेअरमन अरुण डोंगळे adjustभागीरथी संस्था, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने प्रबुध्द भारत हायस्कूलमधील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन प्रदान adjustमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा... adjustकोल्हापूर महानगरपालिका : वर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणाऱ्या 17 ॲटो टिप्पर गाडयांवरील ड्रायव्हरांचे एक दिवसाचे वेतन कपात adjustकोल्हापुरात शेतकऱ्यांचा निर्धार : महायुतीचे ७२ उमेदवार पाडणार adjust२७ ग्रॅम सोन्याचा धनहार जप्त adjustकोल्हापुरात २५ हजाराची लाच स्वीकारताना जीएसटी कर अधिकाऱ्यास अटक
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule14 Oct 24 person by visibility 409 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : यू आर राव सॅटेलाईट सेंटर, बंगळूरु आणि डीकेटीईच्या वायसीपी पॉलिटेक्नीक यांचे संयुक्त विद्यमाने वायसीपी येथे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती देणारे प्रदर्शन नुकतेच भरविण्यात आले यामध्ये उपग्रह आणि प्रक्षेपण वाहन मॉडेल्स, पोस्टर्स यांचे प्रदर्शन व विविध स्पर्धा झाल्या आहेत.

 विद्यार्थीदशेत शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी जागतिक बाजारपेठेत होत असलेले नविन बदल व नविन तंत्रज्ञानाची सांगड घालून समाजउपयोगी उपकरणे निर्माण करण्यावर या प्रदर्शनात भर देण्यात आला. या प्रदर्शनामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचे नवनवीन मार्ग व त्याचे उत्पादकता व गुणवत्ता यांच्याशी निगडीत घटकांचा उहापोह करण्यात आला.

वर्ल्ड स्पेस वीक -२०२४ अंतर्गत इस्त्रो-युआएससी ने ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी तीन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, त्यांची कल्पकता आणि अंतराळ संशोधनाबाबत विविध माहितीपट दाखविण्यात आले. अंतराळ संशोधन क्षेत्रापर्यंत इलेक्ट्रॉनिक्सच्या व सॉफटवेअरच्या वापराने झालेल्या प्रगत तंत्रज्ञानाची अनुभूती आज डीकेटीईच्या वायसीपीमध्ये पहावयास मिळाली.

 या प्रदर्शनामुळे इलेक्ट्रॉनिक्समधील उपकरणे व समाजउपयोगी प्रोजेक्ट बनविन्याचा विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढलेला असून भावी आयुष्यात या मार्गदर्शनाचा त्यांना निश्‍चितच लाभ होईल असा विश्‍वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ समूह संचालक युआरएससी पी.व्ही. बेळगावकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना इस्त्रो व अंतराळ संशोधनाबाबात माहिती दिली. शास्त्रज्ञ जागदेवी पाटील यांनी उपस्थित शास्त्रज्ञांची ओळख करुन दिली.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगातामध्ये संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी इचलकरंजीमध्ये अशा प्रकारचे उपग्रह प्रक्षेपण वाहन मॉडेल्स व अंतराळ संशोधनाबाबतचे प्रथमच प्रदर्शन आयोजित केल्याने प्रदर्शनास भेट दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक पर्वणी ठरली आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून कुशल तंत्रज्ञान निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून विद्यार्थी शिक्षणघेत असताना विद्यार्थ्यांना संशोधनासाठीही या प्रदर्शनाचा लाभ होणार आहे तसेच अनेक जागतिक पातळीवर कंपन्याच्या प्रयोगशाळा व संशोधन केंद्र डीकेटीई शैक्षणिक संकूलात असून त्याच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना असे तंत्रज्ञान बनविण्यासाठी उपयोग होत असल्याचे यावेळी संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे यांनी नमूद केले.

इचलकरंजी शहर आणि परिसरातील ६० शाळेतील ५ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट दिली. विविध शाळांतील निवडक विद्यार्थ्यांनी इस्त्रो युआरएससी मार्फत मेमरी टेस्ट, प्रश्‍नमंजुशा व पीक अँण्ड स्पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या प्रदर्शनाकरीता संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, रवि आवाडे व सर्व ट्रस्टी तसेच वर्ल्ड स्पेस विकचे जागदेवी पाटील, आनंद कुलकर्णी वायसीपीचे प्राचार्य प्रा.ए.पी. कोथळी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक प्रा.एम.एम. कदम व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी काम पाहिले.