SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेशेल्स प्रजासत्ताकचे महामहिम आणि प्रथम महिला यांचे दिल्लीकडे प्रयाणविमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमर्पणाच्या भावनेतून ‘अनुलोम’चे काम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडी वाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटनकोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल: उद्या मतमोजणी; प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्जडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांची आयआयटी व एनआयटीमध्ये इंटर्नशिपसाठी निवडराजर्षी शाहू संगीत रजनी १० फेब्रुवारीपासूनदावोस कराराद्वारे अहिल्यानगरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक ; १८ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तौरल इंडियाच्या सुपा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनभारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतकजिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान; कोल्हापूर जिल्ह्यात 74.35 टक्के मतदानाची नोंद; मतमोजणी 9 फेब्रुवारी रोजी

जाहिरात

 

डी वाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

schedule08 Feb 26 person by visibility 130 categoryक्रीडा

कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी वृषाली पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कदमवाडी येथील डी. वाय पाटील हॉस्पिटल स्डेडियममध्ये झालेल्या या उद्घाटन समारंभाला कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, प्राचार्य डॉ. उमराणी जे., प्रोजेक्ट हेड व स्पर्धा संयोजक सदानंद सबनीस, तानाजी जाधव यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्रमुख उपस्थितीत होते.

 डॉ. संजय डी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सन 2018 पासून डी. वाय पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर प्रेसिडेंट कप स्पर्धेचे आयोजन केले जाते. डी वाय पाटील ग्रुपच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांचे संघ या स्पर्धेत सहभागी होतात. यावर्षी एकूण २८ संघांमध्ये ही स्पर्धा होत आहे. डॉ संजय डी पाटील यांच्या वाढदिनी 18 फेब्रुवारीला अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धा विद्युत झोतात खेळण्यात येणार आहेत.
   
 पृथ्वीराज पाटील व वृषाली पाटील यांच्या हस्ते नाणेफेक होऊन स्पर्धेचा शुभारंभ झाला. या स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यामध्ये खिलाडूवृत्ती वाढेल. सांघिक गुण निर्माण होतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. सर्व कर्मचाऱ्यांना आपले क्रीडा गुण, कौशल्य दाखवून देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. सदानंद सबनीस व प्रोजेक्ट टीमचे त्यांनी कौतुक केले. वृषाली पाटील यांनीही यावेळी सर्व खेळाडूना शुभेच्छा दिल्या.
   
या स्पर्धा साखळी पद्धतीने होणार असून ११ दिवस चालणार आहेत. यामध्ये ग्रुपमधील विविध संस्थांचे पुरुषांचे २६ तर महिलांचे ८ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेतील सलामीचा सामना डी वाय पाटील हॉस्पिटल आणि एबीएस जिम या दोन संघांमध्ये झाला. हा सामना हॉस्पिटल संघाने जिंकला.

स्पर्धा नियोजनासाठी डॉ. सदानंद सबनीस व प्रोजेक्ट टीम तसेच क्रीडा संचालक शंकर गोनूगडे यांच्यासह सहकारी मेहनत घेत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes