शाहू मिल येथे नृत्य कार्यशाळा उत्साहात
schedule14 May 23 person by visibility 179 categoryमनोरंजन
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी वर्ष सांगतेनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित जेष्ठ नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांची नृत्य प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
आज सकाळच्या सत्रात शाहू मिलच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेत सुमारे १०० हुन अधिक छोटे - मोठे विद्यार्थी सामील झाले होते. प्रारंभी बगाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नृत्य म्हणजे काय ? नृत्याचे शारिरीक फायदे तसेच भारतीय व पाश्चात नृत्यायाविषयी प्राथमिक माहिती दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी बगाडे यांच्या सुचनेनुसार नृत्याच्या विविध स्टेप्स केल्या . अतिशय अल्प वेळेत मुलांनी आत्मसात केलेल्या स्टेप्स पाहून उपस्थित पालकांनी आनंद व्यक्त केला .
या कार्यशाळेत बगाडे यांनी यावेळी सेमी क्लासिकल , लोक नृत्य (फोक डान्स ) तसेच पाश्चात नृत्य शैलीतील बारकावे छोट्यांना समजावून सांगितले . महाराष्ट्रीयन व भारतीय नृत्य शैलीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बगाडे यांनी दिली.
बगाडे यांनी सादर केलेल्या नृत्य कौशल्याला , पदन्यांसाला उपस्थित पालक, प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली .या प्रसंगी दळवीज आर्ट्सचे प्राचार्य अजेय दळवी, प्रमोद पाटील,आदित्य बेडेकर, सुखदेव गिरी यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.