मोडी लिपी अभ्यासक्रमास प्रवेशासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
schedule17 Nov 25 person by visibility 60 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मान्यताप्रात मोडी लिपी प्रमाणपत्र कोर्स नाइट कॉलेज कोल्हापूरच्या मराठी विभागाच्या वतीने सुरु करण्यात आला असून प्रवेशासाठी 20 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या कोर्समध्ये मोडीलिपीचे वाचन व लेखन यांचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे. नाइट कॉलेजमध्ये सायंकाळी 6 ते 8 या वेळेत कोर्स होणार असून प्रवेशासाठी किमान इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तरी इच्छुकांनी मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण शिंदे (मो. 9421024055) यांच्याशी दि २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत संपर्क साधून प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राचार्य प्रा. डॉ. उत्तम पाटील यांनी केले आहे.
1960 पूर्वी गेल्या पाचशे वर्षांतील महाराष्ट्रातील प्रशासकीय व्यवहाराची भाषा मोडी होती. त्यामुळे महसूल विभागासह सर्व कागदपत्रे मोडीलिपीत आढळतात. मोडी कागदपत्रांचे भंडार महाराष्ट्रभर पसरलेले आहे. शासकीय-निमशासकीय कामांसाठी, जातीच्या दाखल्यांसाठी, न्यायालयीन कामकाजासाठी महसूल कागदपत्रांसाठी तसेच संशोधनासाठी मोडी कागदपत्रे वाचणार्या तज्ज्ञांची अत्यंत आवश्यकता आहे. मोडी शिकल्यानंतर मोडी कागदपत्रांचे भाषांतर करून करिअर व स्वयंरोजगाराच्या तसेच शासकीय-निमशासकीय पातळीवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.