+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule05 Mar 24 person by visibility 483 categoryआरोग्य
कोल्हापूर : शहरातील महापालिका चौकात भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्या तरुणीचा रेबीजची लागण होऊन मृत्यू झाला. सृष्टी सुनील शिंदे (वय २१, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. सृष्टी शिंदे हिने रेबीज प्रतिबंधक लसही घेतली होती. मात्र तिच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

 ३ फेब्रुवारीला सृष्टी खरेदीसाठी महाद्वार रोडला गेली होती. तेथून परत येताना ती महापालिका चौक परिसरात थांबली होती. यावेळी भटक्या श्वानाने तिच्यासह २० हून अधिक नागरिकांचा चावा घेतला होता. सृष्टी शिंदे हिने रेबीज प्रतिबंधक लसही घेतली होती. त्यानंतर मधल्या काळात तिची तब्येतही चांगली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी अचानक ताप आल्याने तिला पुन्हा सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता, रेबिज झाल्याचे निदान झाले.

  उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री तिचा मृत्यू झाला.सृष्टी शिंदे हिचा मृतदेह घरी न नेता प्रतिबंधात्मक खबरदारी घेत अंत्यसंस्कार करण्यात आले.  तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. भटके कुत्रे ज्या २० जणांना चावले होते त्यांच्या प्रकृतीवरही लक्ष ठेवले जात आहे.