SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अखिल भारतीय पुरुष क्रॉस कंट्री स्पर्धेत विद्यापीठाला सांघिक उपविजेतेपदकोल्हापुरातील सीमा आलमेलकर ठरल्या पैठणीच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी20 ट्वेंटी विश्वचषक 2026 : भारतीय संघाकडून पाकिस्तान पराभूत, इशान किशन विजयाचा शिल्पकार शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवडडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक; राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा, श्रेयस माने-निकिता कोळेकरचे यश भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढालभारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत राहताना पक्ष आणि समाजाबरोबरची बांधिलकी कायम ठेवा : चंद्रकांतदादा पाटीलप्राणी हल्ल्याचा बनाव उघड; ५ वर्षांच्या प्रेमाचा शेवट रक्ताने, गडहिंग्लजचा खूनी प्रियकरास अटकसंत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादनजिल्ह्यात ‘कुसुम’ (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) मोहीम यशस्वी; ४४८ पथकांमार्फत अतिजोखमीच्या गटांची तपासणी

जाहिरात

 

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी निवड

schedule15 Feb 26 person by visibility 116 categoryराजकीय

कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश अबीटकर यांच्या निर्देशाने आणि महाराष्ट्र नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक रंगराव चव्हाण यांची संजय गांधी निराधार योजनेच्या कोल्हापूर शहर अध्यक्ष पदी निवड केली आहे.

या महत्त्वाच्या पदावर दीपक चव्हाण यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यातील निराधार, वृद्ध आणि असहाय्य व्यक्तींना योजनेचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार आहे. संजय गांधी निराधार योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून यांतर्गत गरजू व्यक्तींना आर्थिक सहाय्य, वैद्यकीय मदत आणि सामाजिक संरक्षण मिळते. दीपक चव्हाण हे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांनी शाखाप्रमुख, उप शहर प्रमुख पदावर काम केले आहे ते आमदर राजेश क्षीरसागर यांचे निकटवर्तीय आहेत.


पालकमंत्री प्रकाश अबीटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सक्रिय सहभागाने ही नियुक्ती करण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes