डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयात झोनल बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात
schedule08 Oct 25 person by visibility 226 categoryक्रीडा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत पुरुष आणि महिला झोनल बुद्धिबळ स्पर्धा २०२५ ही स्पर्धा डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालय, गडहिंग्लज येथे यशस्वीरित्या पार पडली.
या स्पर्धेचे उद्घाटन दीनकरराव के. शिंदे स्मारक ट्रस्टचे सल्लागार महेश कोरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांनी भूषविले, तर झोनल क्रीडा सचिव डॉ. निलेश पाटील हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रथम क्रमांक ऋषिकेश कबनुरकर विवेकानंद कॉलेज, द्वितीय क्रमांक अमोल बागलकोटे, न्यु कॉलेज यांनी मिळवला.
एकूण ११८ स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला. विविध वरिष्ठ महाविद्यालयांचे शारीरिक शिक्षण संचालक तसेच इचलकरंजी चेस अकॅडमीचे सदस्य यांनी संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन केले. या स्पर्धेचे एकूण समन्वयन डॉ. ए. डी. शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शारीरिक संचालक सागर शिंदे यांनी केले.
आपल्या मनोगतात महेश कोरी म्हणाले. , स्पर्धा ही खेळाडू वृत्तीने खेळली पाहिजे, कारण क्रीडा आपल्याला जीवनातील चढउतारांचा सामना करण्याचे धडे देतात. प्राचार्य डॉ. डी. व्ही. घेवडे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्यापीठ क्रीडा प्राधिकरणाचे मनःपूर्वक आभार मानले की, त्यांनी हा प्रतिष्ठित उपक्रम महाविद्यालयास सोपविला.
▪️स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत:
▪️पुरुष विजेता संघ –
प्रथम क्रमांक ऋषिकेश कबनुरकर – विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
द्वितीय क्रमांक अमोल बागलकोट – न्यू कॉलेज कोल्हापूर
तृतीय क्रमांक सारंग पाटील – डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
चतुर्थ क्रमांक तन्मय पोवार – डी के टी ई टेक्सटाइल & इंजिनीयर कॉलेज
पाचवा क्रमांक आदित्य सावळकर – UG & PG department शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर
सहावा क्रमांक राहुल लोखंडे – UG & PG department शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर
▪️महिला विजेता संघ –
प्रथम क्रमांक शर्वरी कबनुरकर – के आय टी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कोल्हापूर
द्वितीय क्रमांक मयुरी सावळकर – सायबर कॉलेज कोल्हापूर
तृतीय क्रमांक सृष्टी कुलकर्णी – विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
चतुर्थ क्रमांक वैष्णवी पाटील – डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर
पाचवा क्रमांक मुक्तांजली सावंत – विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
सहावा क्रमांक दिशा पाटील – डी के टी ई टेक्सटाइल & इंजिनियरिंग कॉलेज कोल्हापूर या खेळाडूंची inter zonal स्पर्धेसाठी निवड झाली
कोल्हापूर पंच म्हणून कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील,शैलेश होनकट्टी यांनी काम पाहिले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. शरद किल्लेदार यांनी केले, या बुद्धिबळ स्पर्धेने तरुण खेळाडूंमधील कौशल्य, एकाग्रता आणि क्रीडाभाव अधोरेखित केला.