संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. अजय कोंगे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या “मेंटॉर बोर्ड” कमिटीवर निवड
schedule23 Dec 23 person by visibility 456 categoryसंपादकीय
जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, महाराष्ट्र, विद्यापीच्या “फोरम ऑफ इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि एंटरप्राइझ” “मेंटॉर बोर्ड” कमिटीवर’ “मेंटॉर” म्हणून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे, विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे यांची निवड झाली आहे.
डॉ. नविन खंडारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, फोरम ऑफ इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि एंटरप्राइझ, बाटू, विद्यापीठ यांनी इमेल पाठून अभिनंदन केले. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी निवड झाल्या बद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
प्रा. अजय कोंगे हे केंद्र आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता योजनांचे संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात २०१६ पासून कार्यरत आहेत. त्यांनी शासकीय कौशल्य विकास आणि उद्योजकीय योजना प्रशिक्षणाअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील पाच हजाराहून अधिक होतकरू युवक युवतींना कौशल्य आणि उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक युवतींना रोजगार व स्वयंप रोजगार निर्माण करून दिला आहे.
प्रा. कोंगे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शिरसाटवाडी गावचे असून त्यांचे शिक्षण एम.ए.एम.एड. असून शैक्षणिक, सामाजिक, कौशल्य विकास आणि उद्योजकता क्षेत्रात अतुलनीय कार्याबद्दल आजवर विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ते म्हणाले या निवडी मुळे माझी जबाबदारी वाढली असून भविष्यात तळागाळातील सुशिक्षत बेरोजगार युवक-युवतींना आणि विद्यार्थांना नाविन्यपूर्ण उद्योजकीय कौशल्य विसित करू. असे बोलून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा. कोंगे हे केंद्र आणि राज्य शासनाच्या नियामक मंडळावर समुपदेशक, मार्गदर्शक, सदस्य, म्हणून कार्यरत आहेत. मेंटॉर, जुरी: महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन, मेंटॉर: नीती आयोग भारत सरकार - अटल इनोव्हेशन मिशन (नवीन बदलाचा मार्गदर्शक), मेंटॉर: भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, सल्लागार-समुपदेशक: राष्ट्रीय करिअर सेवा कामगार आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार, टीओटी: माहितीचा अधिकार@२००५ यशदा पुणे, टीओटी: ई- कौसल्य इंडिया, सदस्य: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, स्पीकर: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, गेस्ट फॅकल्टी: उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार. या नियुक्तीबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.