+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule09 Mar 24 person by visibility 349 categoryआरोग्य
कोल्हापूर : नागपुर जिल्हयात बर्ड प्ल्यु आजाराची लागण पक्षामध्ये झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बर्ड प्ल्यु प्रतिबंध व नियंत्रणासाठी नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. 

संक्रमित पक्ष्यांच्या लाळ, श्लेष्मल आणि विष्ठेमध्ये एव्हियन फ्लूचे विषाणू असतात. जेव्हा एखादी व्यक्ती विषाणू असलेल्या पृष्ठभागाला स्पर्श करते, नंतर त्यांच्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करतो तेव्हा एव्हियन फ्लूच्या विषाणूशी मानवांचा संपर्क होऊ शकतो. यासाठी नागरीकांनी काळजी घ्यावी. पक्षी स्त्रावा सोबत संपर्क टाळावा, पक्षी, कोंबडया यांचे पिंजरे आणि ज्या भांडयात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने धुवावीत. शिल्लक मासांची योग्य विल्हेवाट लावावी, एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षांना उघडया हाताने स्पर्श करु नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षास ताबडतोब कळवा. कच्च्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात पाणी व साबणाने वारंवार स्वच्छ धुवावेत. व्यक्तिगत स्वच्छता राखावी. पक्षांचा परिसर स्वच्छ ठेवावा, कच्चे चिकन / चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा, पूर्ण शिजवलेल्या ( १०० डिग्री सेल्सीअस) मांसांचाच खाण्यामध्ये वापर करावा, आपल्या गल्लीत अथवा परिसरात तलाव असेल आणि त्या तलावात पक्षी येत असतील तर या ठिकाणी सुयोग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी वन विभाग / पशुसंवंर्धन विभागास कळविण्यात यावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.  

 नागरीकांनी दक्षता म्हणून कच्चे चिकन / कच्ची अंडी खाऊ नयेत. अर्धवट शिजलेले चिकन / पक्षी, अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नयेत. आजारी दिसणाऱ्या, सुस्त पडलेल्या पक्षांच्या संपर्कात येऊ नये. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेऊ नये अशा सूचना आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या आहेत.