+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule05 Jul 24 person by visibility 371 categoryआरोग्य
इचलकरंजी : डीकेटीई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त डीकेटीईच्या प्राध्यापक व स्टाफ यांच्यासाठी डीकेटीईचे आमचे दादा कार्यक्रम समिती व एनएसएस विभाग आणि अथायु मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबीरात ३०० हून अधिक स्टाफवर मोफत रोगनिदान करण्यात आले. यासोबत दादांच्या वाढदिवसानिमित्त स्टाफसाठी हाफ पिज क्रिकेट स्पर्धा देखील मोठया दिमाखात संपन्न झाले त्यावेळी दादांनी प्रत्यक्षात येवून क्रिकेट स्पर्धेस शुभेच्छा दिल्या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या डायरेक्टर प्रा. डॉ. एल.एस. अडमुठे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी शिबीरास भेट देवून सर्वांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या डायरेक्टर, प्रा. डॉ. अडमुठे यांनी दादांच्या वाढदिवानिमित्त राबविण्यात आलेल्या शिबीरामध्ये संस्थेच्या वतीने दादांना दिर्घायुष्य लाभो यासाठी मनोकामना व्यक्त केल्या. 

 यावेळी डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील, सोशल डीन व एनएसनएस विभागप्रमुख सचिन कानिटकर, सर्व डिन्स, सर्व विभागप्रमुख यांचेसवे अथायु मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, कोल्हापूर यांचे डॉ. सुरज पालकर, सुलक्षणा बिराजदार, डॉ शशिकांत कुुंभार सवे अथायु हॉस्पिटलची संपूर्ण टीम उपस्थित होती.

या शिबीरामध्ये इसीजी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब, वजन, प्रोस्टेट, लघवीची धार तपासणे, गुडघे दुखी, डोळे तपासणे अशा अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या त्याचबरोबर यावेळी उपस्थितांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाला. या शिबीराच्या आयोजना बद्दल सर्व स्टाफनी समाधान व्यक्त केले. प्रा.सुयोग रायजाधव, शिवाजी लोहार यांनी संयोजन प्रतिनीधी म्हणून काम पाहिले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी राहूल जगताप, प्रितम पाटील, विजय भोपे यांच्यासवे सर्वांनी परिश्रम घेतले.