SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दुथडी भरून वाहतीये पंचगंगा अन् कोल्हापूरकर मात्र कोरड्या घशाने त्रस्त! साता समुद्रापारही दुमदुमला 'विठ्ठल विठ्ठल'चा गजर; जर्मनीतील आषाढी वारीने जपली महाराष्ट्राची भक्तीपरंपराशौर्य, सेवा आणि निष्ठा: केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) स्थापना दिवस आणि देशाच्या सुरक्षेचा अभेद्य बुरूजसुवर्णझेप! मीराबाई चानूचा इतिहास; ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक!घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनपैशांअभावी शस्त्रक्रिया थांबणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडीकेटीईच्या २९ विद्यार्थींनींची कॅपजेमिनी या नामांकीत कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवरती निवडजिल्हाधिकारी कार्यालय येथे 27 वा कारगिल विजय दिवस साजराडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवडजलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार : जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

जाहिरात

 

डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौरी गीते स्पर्धा उत्साहात

schedule31 Aug 25 person by visibility 634 categoryसामाजिक

कोल्हापूर : कसबा बावडा येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या "हिरकणी मंच" तर्फे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थिनींसाठी गौरी गीते स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांचा बक्षीस समारंभ शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या उपस्थितीत झाला. रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.

 यामध्ये झिम्मा, सूप नाचवणे,घागर नाचवणे, फुगडी, काटवट कणा ,पायातील घोडा, छूई -फुई या स्पर्धांचा समावेश होता.२५० हून अधिक विद्यार्थिनींनी आपले कौशल्य दाखवत अत्यंत उत्साहाने या स्पर्धामध्ये सहभाग घेतला.
झिम्मा स्पर्धेत हरसखी, जिजाऊ तारा,राजमुद्रा या संघानी बक्षिसे मिळवली.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.नरके यांनी पॉलिटेक्निकमधील हिरकणी मंचतर्फे आपली संस्कृती टिकावी आणि विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जात असल्याचे नमूद केले.

यावेळी श्रीराम संस्था माजी उपसभापती प्रिया पाटील, परीक्षक सुलोचना बागडी,   हिरकणी मंच समन्वयक प्रा.नीलम रणदिवे, प्रा. शीतल साळोखे, प्रा.ऐश्वर्या पाटील,  प्रा.एस.बी.शिंदे, प्रा.नेहा माने, प्रा.वैष्णवी पाटी तसेच ,माजी विद्यार्थी धनराज वाडकर  यांच्यासह हिरकणी मंचमधील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes