शाहूवाडी तालुक्यात धडक कारवाई : गोवा बनावटीची दारुच्या मालाची बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रकमालासह ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त
schedule12 Oct 24 person by visibility 498 categoryगुन्हे
कोल्हापूर: गोवा बनावटीची दारुच्या मालाची बेकायदेशीर वाहतूक करणारे ट्रकमालासह ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलबार सुरेश पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत शाहूवाडी पोलीस ठाणे हददीत बेकायदेशीर गोवा बनावटीची वारा वाहतूक्त करणारा रेकॉर्डवरील आरोपी चेतक वाळवे रा सिंधुदूर्ग हा स्वतः एम एच ०४ एफ एफ १७९४ या स्वीफ्ट गाहीमध्ये पुढे येवून देखरेख करत व पाठीमागून आयशर टेम्पो क एम एच ०७ ए जे ३५१३ मधून बिगरपरवाना, बेकायदा गोवा बनावटीचे विदेशी दारूचे बॉक्स भरून आंबा ते कोल्हापूर रोडने मध्यरात्रीचे वेळी घेवून जाणारआहे अशी माहिती मिळाली या माहितीचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोसई जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, वैभव जाधव, विनोद कांबळे, विनायक चौगुले व पंच यांचेसह दिनांक ११/१०/२०२४ रोजी रात्री मिळालेल्या माहितीप्रमाणे सापळा लावला असता.
आंबा घाटाकडून पांढऱ्या रंगाची स्वीफ्ट गाडी क्रमांक एम एच ०४ एफ एफ १७१४ व आयशर टेम्पो क्रमांक एम एच ०७ ए जे ३५१३ अशी वाहने आली. त्यांना त्याच ठिकाणी थांबवून त्यातील इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नांवे १) चेतक भरत वाळवे, रा. वाळवेवाडी, ता कणकवली २) तुषार तुकाराम वाळवे, रा वाळवेवाडी, ता कणकवली ३) शहाबाज अब्दुल गोरे, रा मुस्लीमवाडी, मानगाव, ता कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग व ४) फारुख दस्तगीर जमादार, रा नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर असे असल्याचे सांगितले आयशर टेम्पोमध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागली त्यानंतर दोन पंचासमक्ष आयशर टेम्पोची झडती घेतली असता आयशर टैम्पोमध्ये खाकी पुठ्ठ्याचे ५०० बॉक्स भरलेले असून प्रत्येक बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या रॉयल ब्लू कंपनीच्या व्हीस्की दारु असलेल्या १८० मिलीच्या ५८ सीलबंद बाटल्या असल्याचे मिळून आल्या. सदरचा माल हा बेकायदेशीर असल्याची खात्री झाल्याने २४,००,०००/- रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारु, १०,००,०००/- रुपये किंमतीचा आपशर टेम्पो व ४,००,०००/- रुपये किंमतीची स्वीफ्ट गाडी असा एकूण ३८,००,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल रितसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द शाहुवाडी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक आलिंदर जाधव व पोलीस अंमलदार नामे सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, वैभव जाधव, विनोद कांबळे, विनायक चौगुले, अमित सर्जे, संजय पहवळ, कृष्णात पिंगळे, महेश पाटील, गजानन गुरव, हंबीर अतिग्रे यांनी केली आहे.