SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूट, उन्हाळी परीक्षा २०२६ मध्ये सर्व विभागांचा उच्चांकित निकाल; २९ विषयाचा निकाल १०० टक्केविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ८ कोटींच्या अपहाराची चौकशी करा; ठेवीदारांचा आक्रमक पवित्राकोल्हापूर : उपसा बंदीला २६ जूनपर्यंत पुन्हा शिथिलताक्रांती चौकाने घेतला मोकळा श्वास ; शहरातील युवकांच्याकडून नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे उद्यापासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जाची मुदत वाढली; आता २ जुलैपर्यंत अर्ज करता येणारअवसायकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका; फणसवाडीच्या हनुमान सहकारी दूध संस्थेच्या याचिकेवर निर्णयकरवीर नगरीत खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवितयुवा पिढीला नशामुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध; प्रत्येक जिल्ह्यात होणार व्यसनमुक्ती केंद्र: मुख्यमंत्री फडणवीसजागतिक ऑलिम्पिक दिन: क्रीडा संस्कृतीचा उत्सव

जाहिरात

 

गोकुळ कर्मचारी पतसंस्था कर्मचाऱ्यांचा विश्वासाचा आधार : नविद मुश्रीफ

schedule16 Jun 25 person by visibility 676 categoryउद्योग

▪️गोकुळ कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्‍था मर्या., कोल्‍हापूर संस्‍थेच्‍या राजारामपुरी येथील कार्यालयास गोकुळ दूध संघाचे नूतन चेअरमन नविद  मुश्रीफ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन सचिन पाटील यांच्या हस्ते गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक किसन चौगले यांचा सत्कार पतसंस्थेच्या पदाधिकारीच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ कर्मचारी पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची संस्था नसून, गोकुळच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेचा व विश्वासाचा आधार आहे. गेल्या अनेक वर्षांत या संस्थेने सभासद कर्मचाऱ्यांना त्यांच्या विविध गरजांसाठी अत्यल्प व्याजदराने कर्जे उपलब्ध करून दिली आहेत. गोकुळच्या प्रगतीच्या वाटचालीत कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून  त्यांचे आर्थिक हित जोपासणाऱ्या कर्मचारी पतसंस्थेची भुमिका भविष्यात आणखी बळकट व्हावी, यासाठी संघाच्या वतीने आवश्यक ती मदत व सहकार्य केले जाईल तसेच भविष्यातील कर्मचाऱ्यांची आर्थिक गरज ओळखून नव्या सुविधा सुरू करण्याची गरज असल्यास संघाचे व व्यवस्थापनाचे संस्थेस नेहमीच पाठबळ राहील, असे आश्वासनही गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिले.

 पतसंस्थेचे चेअरमन सचिन पाटील यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या प्रगतीची व कामकाजाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पतसंस्थेने वेळोवेळी कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार कर्ज मर्यादा वाढविणे, योग्य व्याजदर, ठेवी योजना आणि विविध आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे कर्मचारी वर्गाचा संस्थेवरील विश्वास वृद्धिंगत झाला आहे. आभार संचालक राजेंद्र चौगले यांनी मानले .

          याप्रसंगी गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक किसन चौगले, गोकुळ कर्मचारी पतसंस्‍थेचे चेअरमन सचिन पाटील, व्हा.चेअरमन पांडुरंग कापसे, संचालक राजेंद्र चौगले, जयदिप आमते, रामचंद्र पाटील, तुकाराम शिंगटे, सुनिल वाडकर, संदेश भोपळे, दत्तात्रय डवरी, अशोक पुणेकर, गिता उत्तुरकर, पतसंस्थेचे सचिव संभाजी माळकर तसेच पतसंस्थेचे कर्मचारी आदि उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes