SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक रक्तदाता दिन: माणुसकीच्या रक्ताचे नाते!भाजपाच्या वतीने १५ जून रोजी कोल्हापुरात ‘सेवा अभियान’खत विक्रीसाठी ऑफलाईन व्यवस्था सुरू करा : आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पोलीस दलाच्या वाहनांचे लोकार्पणनशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाहीडीकेटीईमध्ये मी राजवाडा बोलतोय ओपन हाउस उपक्रमास विक्रमी प्रतिसादशिवाजी विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी २४ जूनला पुनर्प्रवेश परीक्षाआंतरराष्ट्रीय जनसंपर्क (PR) दिवस: संवादाच्या पलीकडचे एक व्यावसायिक पर्वकोल्हापूर: महायुतीची अमित शहांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी; पाणी टंचाईवर मंत्री मुश्रीफ यांचे आश्वासनराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

जाहिरात

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव शक्ती प्रदर्शनाने देणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

schedule12 Jun 26 person by visibility 292 categoryउद्योग

▪️मुश्रीफ म्हणाले, ठराव सुपूर्द करताना ठराव धारकांसोबत मी स्वतः उपस्थित असणार
          
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोकुळ दूध संघाचे ठराव एकत्रितपणे गोळा करून शक्ती प्रदर्शनाने जमा करणार आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सहायक निबंधक- दूग्ध यांच्याकडे ठराव सुपूर्द करण्याच्या या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित राहणार आहे, असेही ते म्हणाले.   
                  
मंत्री  मुश्रीफ भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात एका बैठकीसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.
       
मंत्री  मुश्रीफ पुढे म्हणाले,  सहायक निबंधक हे ठराव जर एक- एक अशा पद्धतीने घेणार असतील तर आम्ही सर्वच ठरावधारक एकत्र मिळून जाणार आहोत. ठरावधारक संस्था प्रतिनिधी आधार कार्ड घेऊन आत जातील व त्यांच्या- त्यांच्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी त्या ठरावाची नोंद होईल. ठराव सुपूर्द करून ते पोहच घेतील.
        
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत विचारले असता  मुश्रीफ म्हणाले, ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, महायुतीच जिंकणार आहे आणि चेअरमनही महायुतीचाच होणार आहे.
    
*ठराव देण्याची तारीख.....!*
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर म्हणाले, गोकुळ दूध संघाचे ठराव सहायक निबंधक- दुग्ध यांच्याकडे जमा करण्याची तारीख लवकरच कळविली जाईल. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही संस्थेने परस्पर ठराव देऊ नयेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes