आयएसएसओ आयोजित राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे घवघवीत यश
schedule01 Oct 24 person by visibility 294 categoryक्रीडा
अतिग्रे : नीता मुकेश अंबानी इंटरनॅशनल ज्युनिअर स्कूल कुर्ला बांद्रा, मुंबई या ठिकाणी इंटरनॅशनल स्कूल्स स्पोर्ट्स ऑर्गनायझेशन (ISSO ) आयोजित ज्युडो स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी 31 पदक प्राप्त केले. त्यामध्ये 18 सुवर्णपदक, 7 रजत पदक व 6 कांस्यपदक संजय संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी प्राप्त करत या स्पर्धेत आपला वेगळा ठसा उमटवला.
83 आंतरराष्ट्रीय स्कूलमधील 600 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. पदक प्राप्त विद्यार्थी खालील प्रमाणे
सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी - निरंजन चव्हाण, अंश अव्हाड, शौर्य गावडे, शौर्यजीत देशमुख, हर्षल दर्शले , अर्णव घरात, रुजान अगरवाल, प्रेमकुमार कुडची, अभिनित तिलेकर, मोहित राठोड, आर्यन बिराजदार , सोहम पाटील, सौरभ शिंदे, हर्ष सोनी, गुरुवीर सन्नकी, सफवान काजी, हर्षाली चव्हाण, भागीरथी नागदे,
रौप्यपदक प्राप्त विद्यार्थी - प्रणाली रोडगे, प्रज्वल भोरे, देवांश जावेरी, अजय शिंदे, राजवर्धन पिसे, वल्लभ पांचाळ, शिवदुर्गा जाधव, कांस्यपदक प्राप्त विद्यार्थी रुद्र माने, आदिराज आमले, अलोक जैस्वाल, यशस्विनी सानशी, आर्या कोरे, समायरा आवाडे
सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना प्रशिक्षक श्री विष्णू पुजारी व श्री बॉबी यादव यांचे मार्गदर्शन संघाला लाभले. संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सास्मिता मोहंती, प्राचार्य एच एम नवीन, प्राचार्य नितेश नाडे, प्राचार्य अस्कर अली आणि क्रीडा संचालक विठ्ठल केंचन्नावर, यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.