SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवायला येणार ‘गुलकंद’ ;१ मे २०२५ रोजी होणार प्रदर्शितकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान; करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदानधन्यवाद कोल्हापूर, राज्यात पुन्हा मतदान टक्केवारीत जिल्हा अग्रेसर : जिल्हाधिकारी, अमोल येडगेलाटकरांना लावला गुलाल, ऋतुराज पाटील यांना घेतले खांद्यावर मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश; सतेज पाटील यांनी घेतला आढावाराजभवन येथे चित्रकारांची कार्यशाळा संपन्न; राज्यपालांकडून युवा कलाकारांना कौतुकाची थापविधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदानविधानसभा निवडणूक 2024: बीडचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या धक्क्याने निधनकोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदानकोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फुर्तपणे मतदान; जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 पर्यंत सरासरी 54.06 टक्के मतदानजिल्ह्यातील 3452 केंद्रांवर मतदान; मतदान केंद्रावर येवून मतदान करणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा प्रमाणपत्र देवून सन्मान

जाहिरात

 

हरियाणात भाजपाची हॅट्रिक; जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आघाडीचे सरकार

schedule08 Oct 24 person by visibility 309 categoryदेश

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग तिसरा विजय संपादित करत विजयाची हॅट्रिक केली. विधानसभेच्या ९० जागांपैकी भाजपने ४८ जागा मिळवून बहुमत संपादित केले. तर जम्मू-काश्मिरातून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने बाजी मारली आहे.

नॅशनल कॉन्फरन्सने तब्बल ४२ जागाआणि काँग्रेसने ७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडचे सरकार सत्तेत येणार आहे.

 काश्मिरमधील विजयानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी केली. शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असतानाही भाजपने हरियाणात घवघवीत यश मिळवले. 

हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी १२ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. नायबसिंग सैनी यांच्यावर जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यावेळी भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाली. 

काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडचे सरकार सत्तेत येणार आहे. राज्यात काँग्रेस सत्ता स्थापन करणार असली तरी गेल्या वेळच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या सुमारे ५० टक्के जागा घटल्या आहेत. तर गेल्यावेळी भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीचा सुपडासाफ झाला. भाजपला ४ जागांचा फायदा झाला. पण भाजपने जिंकलेल्या सगळ्या जागा या जम्मूमधल्या आहेत. काश्मीर खोऱ्यात भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही.

 जम्मू-काश्मिरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि काँग्रेस आघाडीने ९० पैकी ४९ जागापटकावल्या आहेत. राज्यात बहुमतासाठी ४६ जागांची गरज असताना एनसी-काँग्रेस आघाडीने ३ अतिरिक्त जागा संपादित केल्या आहेत. तर भाजपला राज्यात २९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच पीडीपीला ३ आणि इतरांचा ९ जागांवर विजय झाला आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes