SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वारसा जतन : काळाची गरज आणि आपली जबाबदारीमोदी सरकारला मोठा धक्का: लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक फेटाळले!मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ता, हद्दी व सीमा बाबत आराखडा निश्चित करा : आमदार अमल महाडिकशासन राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईककोल्हापूर : बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंदशिवाजी विद्यापीठात पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरूडाचे दर्शन तीन महिन्यांपासून जोडीचे वास्तव्य; समृद्ध व सुरक्षित जैवविविधतेवर शिक्कामोर्तबकुक्कुट पालन प्रशिक्षणार्थींनी संपर्क साधण्याचे आवाहनकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी तक्रारी दाखल करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी10 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित; कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा मुबलक साठाजयसिंगपूर येथे नूतन बस स्थानकाच्या इमारतीचा लोकार्पण : एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व सुलभ प्रसाधनगृह मोफत करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंचे आरोग्य शिबीर व लसीकरण

schedule31 Jan 26 person by visibility 925 categoryआरोग्य

कोल्हापुर : हज फौंडेशन, कोल्हापूर , लिम्रास चैरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर आणि मुस्लिम वेल्फेअर फौंडेशन इचलकरंजी या तिन्ही समाजसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने  
दि.२८ व २९ जानेवारी २०२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हज यात्रेकरूंसाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी व उपजिल्हा रुग्णालय कसबा बावडा येथे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात एकूण २९९ पैकी २७५ हज यात्रेकरूंच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.त्यानंतर ३० जानेवारी  रोजी जिल्ह्यातील २९९ पैकी २७५  हज यात्रेकरूंचे लसीकरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे,छत्रपती प्रमिला राजे जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा पाटील,उपजिल्हा रुग्णालय कसबा बावडा च्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.नीलिमा पाटील,डॉ.उमेश कदम,डॉ.कदम, डॉ.चौगुले,मानसी घोलतकर,त्याचबरोबर नर्सिंग कर्मचारी,महा लॅब चे सर्व कर्मचारी, उपस्थित होते.

हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर यांचे सहकार्य लाभले.

यावेळी हज यात्रेकरूं बरोबरच   समीर मुजावर, इकबाल देसाई,इम्तियाज बारगिर,बाबासाहेब शेख, बालेचांद महालदार, शफी आत्तार ,यासीन उस्ताद, कलीम खान,आदिल देसाई,अस्लम मोमीन,समीर पटवेगार,बशीर कोठिवाले, समीर जमादार,जुबेर मुजावर, वसीम नाईकवाडे, अबुबकर मोमीन,मुनेरा कोठीवाले, यास्मिन जमादार यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes