+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule26 May 24 person by visibility 378 categoryक्रीडा
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामाचा अंतिम सामना 26 मे (रविवार) रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 8 गडी राखून पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनला आहे. तर सनरायझर्स हैदराबादचे दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.

आयपीएल 2024च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबाद संघाने 18.3 षटकांत 10 गडी गमावून केवळ 113 धावा केल्या. 

हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा फलंदाज व्यंकटेश अय्यरने केलेल्या अर्धशतकी आणि रहमानउल्ला गुरबाजने केलेल्या ३९ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर कोलकाताने १०.३ ओव्हरमध्ये आव्हान पार करत अंतिम सामना जिंकला

हैदराबादच्या डावाची सुरूवात खराब झाली. अभिषेक शर्मा दोन धावा तर, ट्रॅव्हिस हेड खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. सामन्यात कोलकात्याच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यापुढे हैदराबाद गडगडला. राहुल त्रिपाठी 9, एडन मार्कराम 20, नितीशकुमार रेड्डी 13, हेनरिक क्लासेन 16, शाहबाज अहमद 8, अब्दुल समद 4, पॅट कमिन्स 24, जयदेव उंडकट 4 धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमार खाते न उघडता नाबाद राहिला.

कोलकाताकडून आंद्रे रसेलने तीन तर स्टार्क आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय वैभव अरोरा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पंजाब किंग्जचा (PBKS) वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यांनी या आयपीएल हंगामात वर्चस्व गाजवले.  विराट कोहलीने संपूर्ण मोसमात शानदार फलंदाजी करत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. तर हर्षल पटेलने सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप पटकावली.

35 वर्षीय विराट कोहलीने IPL 2024 मध्ये 15 सामन्यांमध्ये 61.75 च्या सरासरीने आणि 154.69 च्या स्ट्राइक रेटने 741 धावा केल्या.  या काळात किंग कोहलीने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. विराटने दुसऱ्यांदा ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. आयपीएलमध्ये दोनदा ऑरेंज कॅप जिंकणारा कोहली हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.  यापूर्वी कोहलीने 2016 च्या मोसमात 973 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती.

वेगवान गोलंदाज हर्षल पटेलबद्दल बोलायचे तर त्याने या मोसमात 14 सामन्यात 19.87 च्या सरासरीने आणि 9.73 च्या इकॉनॉमी रेटने 24 विकेट घेतल्या. हर्षल पटेलने दुसऱ्यांदा पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. याआधी हर्षलने 2021 च्या मोसमात पर्पल कॅपही जिंकली होती.