+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustतेलंगणात पावसामुळे 4 दिवसांत 29 जणांचा मृत्यू, 29 जिल्हे पुरामुळे त्रस्त adjustवादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ adjustराजे उमाजी नाईक यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री यांचे अभिवादन adjustकोल्हापुरात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन adjust‘वर्षा’ निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना; राज्यातील जनतेला सुख, समृद्धी मिळू दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे adjustआमदार सतेज पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान..... adjustउपनगरांच्या विकासासाठी शारंगधर देशमुख यांचे भरीव काम : आमदार ऋतुराज पाटील adjustमानवी जीवन मुल्याचे प्रतिबिंब वास्तुत दिसावे; कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये जगप्रसिद्ध वास्तु विशारद शिरीष बेरी यांचे कार्यशाळेत प्रतिपादन adjustरोटरी क्लब शिक्षक दिन विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करून देशाला बलशाली बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या गुरूंचा सन्मान adjustविद्यार्थ्यांनी चाणाक्ष्यवृत्तीने उत्तम संधीचा शोध घेतला पाहिजे : डॉ. वर्षा मैंदरगी
IMG-20240901-WA0023
DYP_Group_Advt_-_Tarun_Bharat_-_32_X_45_1_
schedule16 Jul 24 person by visibility 234 categoryउद्योग
▪️कोल्हापूर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था डॉ.महेश कदम यांचा गोकुळतर्फे सत्कार

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये डॉ.महेश कदम यांची विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर, विभाग (कोल्हापूर,सांगली,सातारा) या पदावरती पदोन्नती झालेबद्द्ल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रधान कार्यालय,गोकुळ शिरगाव येथे सत्कार करण्‍यात आला.

यावेळी डॉ.महेश कदम म्हणाले की, आदर्श व्यवस्थापन व उत्तम गुणवत्ता म्हणजेच गोकुळ असून गोकुळचा उल्लेख देशभरात सहकारातील एक आदर्श संस्था म्हणून आवर्जून केला जातो. गोकुळ मधील दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यामध्ये चांगला समन्वय असून प्रत्येकाला गोकुळ ही आपली संस्था आहे, अशी भावना याठिकाणी पाहायला मिळत असल्यामुळेच आज गोकुळ प्रगती पथावर आहे. उपनिबंधक (दुग्ध) या पदावर कार्यरत असताना गोकुळ सोबत काम करताना खूप अभिमान, आनंद आणि समाधानाचा प्रत्यय आला. आज पदोन्नतीने नव्या पदावर रुजू झालेबद्दल या सत्कार प्रसंगी तोच अभिमान वाटत आहे. माझा गोकुळ सोबतचा असलेला ऋणानुबंध यापुढेही असाच सुरू राहील असे मनोगत कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम यांनी व्यक्त केले व सहकारातील अग्रगण्य संस्था असलेल्या गोकुळ ने उत्तरोत्तर उत्कर्षाचे नवनवीन मानदंड प्रस्थापित करावेत अशा सदिच्छा दिल्या.

 यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले , दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक यांचे हित व सहकारातील मार्गदर्शक तत्वांची जपणूक करत, गोकुळची वाटचाल चालू आहे. डॉ.महेश कदम यांनी गोकुळ दूध संघास शासन स्तरावर सर्वोतपरी मदत व मार्गदर्शन करावे. यावेळी त्यांना गोकुळ परिवारातर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.